Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिक्षण संचालनाचा नवीन फर्मान! शाळांना कराव्या लागतील एकत्रित कवायती

येणाऱ्या प्रजासत्ताक दिनापासून शाळांमध्ये कार्यक्रम साजरा करण्याच्या पद्धतीत बदल करून एकत्रित शारीरिक कवायती घेण्याचा आदेश शिक्षण संचालनालयाने दिला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 19, 2025 | 06:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • २६ जानेवारीच्या एकत्रित कवायतींचे नियोजन करण्याचे निर्देश
  • दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार
  • शालेय शिक्षणाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि व्यापक उपक्रम
येणाऱ्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यातील शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या पद्धतीत मोठा बदल करण्यात येणार असून, शाळांनी स्वतंत्रपणे कार्यक्रम न करता एकत्रित स्वरूपात शारीरिक कवायती आयोजित कराव्यात, असा स्पष्ट आदेश शिक्षण संचालनालयाने दिला आहे. दरवर्षी बहुतांश शाळांमध्ये आपापल्या शाळेच्या आवारात झेंडावंदन, एनसीसी, स्काऊट-गाईडचे संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात होते; मात्र यंदापासून हा पारंपरिक स्वरूपाचा कार्यक्रम बदलून विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी एकत्र आणून सामूहिक कवायती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

बँक ऑफ इंडियामध्ये भरती! क्रेडिट ऑफिसर पदासाठी जागा रिकामे, करा अर्ज

शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्याबाबत जागरूकता आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे शिक्षण संचालनालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. या उपक्रमासाठी शिक्षण संचालनालयाकडून १४ मिनिटांचा देशभक्तीपर गीतांचा विशेष व्हिडीओ तयार करण्यात आला असून, त्याच व्हिडीओच्या तालावर आणि सूचनांनुसार विद्यार्थ्यांना शारीरिक कवायती कराव्या लागणार आहेत. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना एका मोठ्या, सामायिक मैदानावर एकत्र करून हा उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या नव्या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शाळांना आधीपासूनच तयारी करावी लागणार असून, दर शुक्रवार आणि शनिवार शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून कवायतींचा सराव करून घ्यावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. यासोबतच गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षण उपनिरीक्षक आणि केंद्रप्रमुख यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील किती शाळा सहभागी होणार आहेत, किती विद्यार्थी एकत्र येणार आहेत, कोणते मैदान निवडले जाणार आहे, त्या मैदानाची क्षमता किती आहे, तसेच पार्किंग, वाहतूक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सोयी उपलब्ध आहेत की नाही, याची सखोल पडताळणी करावी लागणार आहे.

कोल इंडियामध्ये ट्रेनी पदासाठी भरती! तुमच्या करिअरद्या स्टार्टर, घडवा उत्तम भवितव्य

या सर्व बाबी लक्षात घेऊन २६ जानेवारीच्या एकत्रित कवायतींचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, २६ जानेवारीपासून पुढील प्रत्येक वर्षी याच पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार असल्याचेही शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. मात्र, या उपक्रमात विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या उपक्रमात राज्यातील एक लाखांहून अधिक शाळा, सात लाखांपेक्षा जास्त शिक्षक आणि दोन कोटींपेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून, हा उपक्रम राज्यातील शालेय शिक्षणाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा आणि व्यापक उपक्रम ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: A new directive from the directorate of education on republic day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • Republic Day

संबंधित बातम्या

मुंबईतील शाळेत प्रजासत्ताक दिनाचा उत्साह! देशभक्तीच्या रंगात रंगला कांदिवलीची सेंट लॉरेन्स हायस्कूल
1

मुंबईतील शाळेत प्रजासत्ताक दिनाचा उत्साह! देशभक्तीच्या रंगात रंगला कांदिवलीची सेंट लॉरेन्स हायस्कूल

Republic Day Global Celebration : तिरंग्याच्या रंगात न्हाली दुनिया! दुबई ते न्यूझीलंड मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन भारतीय दूतावास
2

Republic Day Global Celebration : तिरंग्याच्या रंगात न्हाली दुनिया! दुबई ते न्यूझीलंड मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन भारतीय दूतावास

Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती
3

Virar : २५ लाखांहून अधिक किमतीचे हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती

Republic Day 2026: कर्तव्यपथावर भारताचा ‘रुद्रावतार’! 21 तोफांची सलामी, 29 फायटर जेट अन् जग पाहणार महासत्तेच्या शक्तीचे भव्य दर्शन
4

Republic Day 2026: कर्तव्यपथावर भारताचा ‘रुद्रावतार’! 21 तोफांची सलामी, 29 फायटर जेट अन् जग पाहणार महासत्तेच्या शक्तीचे भव्य दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.