फोटो सौजन्य - Social Media
भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India – AAI) पूर्व विभागामार्फत 2025 साली वरिष्ठ सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. जाहिरात क्र. ER/02/2024 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, अकाउंट्स व राजभाषा या शाखांमध्ये एकूण 32 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी केवळ पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, झारखंड, सिक्कीम व अंडमान-निकोबार बेटे येथील रहिवासी उमेदवार पात्र आहेत. अर्ज प्रक्रिया 5 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार असून, शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2025 आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.aai.aero या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. अर्ज भरताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव व आवश्यक कागदपत्रे अचूक भरावी व ऑनलाइन शुल्क भरावे.
या भरतीमध्ये तीन प्रकारची पदे आहेत. वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) साठी उमेदवाराकडे इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन किंवा रेडिओ अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे आणि किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. अकाउंट्स पदासाठी पदवी (B.Com प्राधान्य) आणि MS Office मध्ये संगणक साक्षरता आवश्यक आहे. राजभाषा पदासाठी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये मास्टर्स डिग्री आणि भाषांतर कोर्स किंवा डिप्लोमा आवश्यक आहे, तसेच दोन वर्षांचा संबंधित अनुभव असावा.
उमेदवाराचे वय 1 जुलै 2025 रोजी 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. ओबीसी, SC/ST, माजी सैनिक, महिला आणि AAI कर्मचारी यांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होईल, प्रथम 100 गुणांची संगणक आधारित परीक्षा (CBT), त्यानंतर संगणक साक्षरता चाचणी (फक्त अकाउंट्स व राजभाषा पदांसाठी), आणि शेवटी कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय चाचणी.
सामान्य, ओबीसी व EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹1000/- आहे, तर SC, ST, माजी सैनिक, महिला व AAI अप्रेंटिस यांच्यासाठी कोणतेही शुल्क नाही. ही संधी प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून तयारीस लागणे गरजेचे आहे.