Air India: एअर इंडिया युरोपमधील १० शहरांसाठी नॉन-स्टॉप उड्डाणे चालवते, ज्यात लंडन (हीथ्रो आणि गॅटविक), पॅरिस (चार्ल्स डी गॉल), फ्रँकफर्ट, अॅमस्टरडॅम, मिलान, कोपनहेगन, व्हिएन्ना आणि झुरिच यांचा समावेश आहे.
मुंबईहून जोधपूरला निघालेलं एअर इंडियाचं विमान (AI 645) तांत्रिक बिघाडामुळे अचानक मुंबई विमानतळावर परतलं. पायलटने वेळीच घेतलेल्या योग्य निर्णयामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांचा जीव वाचला.
एअर इंडिया एक्सप्रेस विमान सेवेतही एक आश्चर्यकारक घटना घडली. श्रीनगरहून विमानात चढलेला एक प्रवाश दिल्लीत उतरणार होता पण तो ओडिशातील भुवनेश्वरला पोहोचला. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून सापडलेला ब्लॅक बॉक्स सुरक्षितरित्या हस्तगत करण्यात आला असून त्यातील क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल (CPM) २५ जून २०२५ रोजी AAIBच्या प्रयोगशाळेत उघडण्यात आले.