फोटो सौजन्य - Social Media
सध्या आर्टीफिसिअल इंटेलिजन्स ( AI )ने कहर केला आहे. कठीण कामांना सोपे करण्यामागे AI चा मोठा हातभार आहे. आर्टीफिसिअल इंटेलिजन्स म्हणजे मानवनिर्मित बुद्धिमत्ता होय. पण ही मानवनिर्मित बुद्धिमत्ता मानवापेक्षाच बुद्धिमान होत चालली आहे. हे खरे आहे कि, मानवाने स्वतःच्या बुद्धीने तयार केलेला अविष्कार कधीही मानवाच्या नियंत्रणाच्या बाहेर जाणार नाही. परंतु, मानवाचा हाच अत्यंत हुशार अविष्कार मानवाच्या अनेक नुकसानाचे कारणही बनू शकतो. हळूहळू AI संपूर्ण जगाच्या नजरेत येत आहे. बहुतेक लोक AI च्या साहाय्याने आपले काम करत आहेत. एखाद्या भाषेला अनुवाद करणे असो किंवा त्या भाषेला शिकणे असो, AI प्रत्येक गोष्ट सोपे करून देत आहे. AI ला कोणताही प्रश्न विचारा, त्या प्रश्नांचे उत्तर AI अगदी फाडफाड देतो. जगभरात अनेक विद्यार्थी त्यांच्या अभ्यासादरम्यान AI ची मदत घेत आहेत.
हे देखील वाचा : इंडिविजुअल कंसल्टेंट पदी होणार उमेदवाराची निवड; RITS ची बंपर भरती
AI मुळे अनेक नोकऱ्या अडचणीत येण्याच्या शक्यता आहेत. एकंदरीत, काही नोकऱ्या अडचणीत येण्यासही सुरुवात झाली आहे. यात सर्वप्रथम समावेश कॉल सेंटरचा केला तर चुकीचे ठरणार नाही. HomeServe सारख्या कंपन्यांनी “चार्ली” सारखे AI-शक्तीवर चालणारे सहाय्यक सादर केले आहेत, जे दिवसाला 11,400 कॉल हाताळण्यास सक्षम आहेत. भविष्यात सारखा परिणाम इतर नोकऱ्यांवरही पाहायला मिळणार आहे. सुंत्रानुसार, ऑटोमेशन अमेरिकेतील ३०० मिलियन नोकऱ्यांना प्रभावित करू शकते.
AI मुळे ज्या नोकऱ्या अडचणीत येणार आहेत यामध्ये मुख्यतः लिखाण तसेच एडिटिंग संबंधित नोकऱ्यांचा समावेश आहे. चॅट GPT कोणत्याही भाषेत लेख लिहण्यास समर्थ आहे. तसेच AI इतर वेबसाइट्सपेक्षा जास्त पटीने लिखाणातील त्रुटी सुधारतो. त्यामुळे भविष्यात लेखन क्षेत्रात AI चा पगडा भारी असणार आहे. याचा परिणाम तेथील नोकऱ्यांवर पडणार आहे. इंटरनेटवर अनुवाद करण्यासाठी अनेक साईट्स उपलब्ध आहेत. परंतु, अनुवादादरम्यान या साईट्स मोठ्या प्रमाणात चुका करतात असे बऱ्याचदा आढळून आले आहे. पण अनुवादाच्या मुद्दयातही AI ने बाजी मारली आहे. AI उत्तम अनुवादक असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत आले आहे. त्यामुळे याचा घातक परिणाम अनुवादकाच्या जागेवर होणार आहे.
याचबरोबर ग्राफिक डिजाईनर, अकाउंटंट, डेटा एन्ट्री तसेच बँक टेलरसारखे अनेक नोकऱ्या AI मुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे. परंतु, AI नोकरीच्या नव्या संधींना नक्कीच चालना देईल. AI जरी ऍडव्हान्स असला तरी तो शेवटी मानवनिर्मितच आहे. AI स्वतः चालत नाही, त्याला सूचनांद्वारे चालवावे लागते. त्यामुळे त्या सूचना देण्यासाठी नक्कीच कुण्या व्यक्तीची गरज भासणार आणि नोकरीच्या एका नव्य संधीला फाटा फुटणार.