ANEET PADDA (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
सैय्यारा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून या हिंदी चित्रपटाने ब्लॉकबास्टरवर धमाका केला आहे. हा चित्रपट १८ जुलै २०२५ ला प्रदर्शित झाला. त्याने बॉक्स ऑफिसवर 14 कोटींची कामे केली आहे. हा चित्रपट लवकर १०० कोटी पार करणार असल्याचे म्हंटले जात आहे. हा चित्रपट रोमँटिक, प्रेम, तुटलेले हृदय आणि जीवनातील आव्हानेवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट यश राज फिल्म्स द्वारा निर्मित आहे.
या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री चर्चेत आहे. तिला तिच्या सौंदर्यासाठी नेशनल क्रश देखील म्हंटल्या जात आहे. ती केवळ २२ वर्षाची आहे. तिच्या सौंदर्याने प्रेषक घायाळ झाले आहे. या अभिनेत्रीने आपले शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटी मधल्या एका नामांकित कॉलेज मधून केला आहे. ही स्टार अभिनेत्री आहे तरी कोण? तीच शिक्षण किती आणि कोणत्या कॉलेज मधून? आणि ती एका सामान्य मुलीपासून स्टार कशी बनली? जाणून घेऊया.
कोणत्या कॉलेज मध्ये झाले शिक्षण?
सैयारा चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्रीच नाव अनीत पड्डा आहे. ती मूळची पंजाबच्या अमृतसर मधली आहे. तीच शिक्षण दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्रसिद्ध कॉलेज मध्ये झालं आहे. त्या कॉलेजच नाव जीसस एंड मैरी कॉलेज (JMC) असं आहे. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलच्या नुसार त्यांनी या कॉलेज मध्ये ह्यूमैनिटीज मध्ये पदवीप्राप्त केली आहे. तिने शालेय शिक्षण स्प्रिंग डेल सीनियर स्कूलमधून पूर्ण केले. ती जेव्हा कॉलेजला होती तेव्हा तिने अभ्यासासोबत ऑडिशन्स सुद्धा दिले. तिच्या इंस्टाग्रामवर जेएमसी स्टुडंट्स कौन्सिलचे अनुसरण केले आहे. त्यावरून समजते की ती आपल्या कॉलेजशी जोडलेली आहे. याच कॉलेजमधून तिने अभिनेत्री होण्याचे स्वप्न पहिले आणि अभिनयाच्या जगात आली.
एका सामान्य मुलीपासून स्टारपर्यंत
अनित पद्डा यांचा जन्म ऑक्टोबर २००२ मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला. एका साध्या कुटुंबातून आलेल्या अनितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती ज्यामुळे ती मुंबईत आली. येथे तिने जाहिरातींमधून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिचे सौंदर्य आणि पडद्यावरची उपस्थिती लवकरच लोकांचे लक्ष वेधून घेत गेली आणि हेच तिच्या मोठ्या यशाचा आधार बनले. यशराज फिल्म्स (YRF) वेबसाइटनुसार, मुंबईच्या जाहिरात उद्योगातील तिच्या कठोर परिश्रमाने तिला शोबिझच्या जगात पहिले धडे दिले, परंतु खरी कहाणी तिच्या अभ्यासापासून सुरू होते.
कोणत्या चित्रपटातून पर्दापण
२०२२ मध्ये अनितने ‘सलाम वेंकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट रेवतीने दिग्दर्शित केले होते. या चित्रपटात काजोल मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात तिची भूमिका जरी लहान असली तारील तिला ओळख मिळाली. त्यानंतर २०२४ मध्ये तिने अमेझॉन प्राइमच्या ‘बिग गर्ल्स डोन्ट क्राय’ या वेब सिरीजमध्ये रोही ही भूमिका साकारली. या शोमध्ये पूजा भट्ट, रायमा सेन सारख्या ज्येष्ठ कलाकारांसोबत काम करून अनितने आपले स्थान निर्माण केले. आणि आता सैयारा चित्रपटाने अनितला ‘नॅशनल क्रश’ ही पदवी मिळवून दिली.
UGC NET 2025: यूजीसी नेटचा निकाल जाहीर; कसे बघता येईल निकाल, कटऑफ काय?