फोटो सौजन्य - Social Media
देशाच्या सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहत आहात तर या भरतीला लक्षात घ्या. सीमा सुरक्षा दलामध्ये ही भरती सुरु करण्यात आली आहे. कॉस्टेबल पदासाठी ही भरती सुरु करण्यात आली असून, या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. एकूण 3588 पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये 3406 पदांसाठी पुरुष उमेदवारांना अर्ज करता येणार आहे, तर 182 पदांसाठी महिला उमेदवार भरती करण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ठराविक तारीख निश्चित करण्यात आली असून उमेदवारांना ती तारीख लक्षात घेऊन अर्ज करावे लागणार आहे. २३ ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात तर जास्तीत जास्त २५ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणारे उमेदवार वयोमर्यादेत जाहीर करण्यात आलेल्या सुटीचा लाभ घेऊ शकतात. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. किमान १०० रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले असून SC तसेच ST प्रवर्गातील लोकं अगदी मोफत अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) किंवा त्यासमान पात्रता मिळवलेली असणे आवश्यक आहे. याशिवाय, जर उमेदवारांनी संबंधित क्षेत्राशी निगडित प्रमाणित (Certified) कोर्स पूर्ण केलेला असेल, तर त्यांना निवड प्रक्रियेत अतिरिक्त लाभ मिळू शकतो.
नियुक्तीची प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडते. पहिल्या टप्प्यात शारीरिक मानक चाचणी (PST) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) घेण्यात येते. PST मध्ये उंची, वजन आणि छातीची मोजणी यासारखी शारीरिक निकष तपासले जातात, तर PET मध्ये धावणे, लांब उडी, उंच उडी अशा शारीरिक क्षमता तपासल्या जातात. उमेदवारांनी या दोन्ही चाचण्या निश्चित वेळेत आणि दिलेल्या निकषांनुसार पार करणे आवश्यक असते.