राज्यात १४ हजार पोलीसपदांची मेगा भरती, आज होणार निर्णय
राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आणि वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत तब्बल १४ हजार पोलीस पदांच्या भरती संदर्भातील निर्णय होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील तरुण पोलीस भरतीची वाट पाहत आहेत. ही बातमी त्यांच्यासाठी एक नवा आशेचा किरण ठरणार आहे. अनेक महिन्यांपासून राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रियी रखडली होती. त्यामुळे उमेदवारांमध्ये मोठे नाराजीचे वातावरण होते. पण मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत पोलीस भरतीचा निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रीया वेगाने सुरू होईल.
राज्यातील रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या भरतीच्या माध्यमातून हजारो तरूणांची स्वप्ने पूर्ण होणार आहेत. राज्यसरकारच्या (Mahayuti Sarkar) या घोषणेनंतर लवकरच पोलीस भरतीसंदर्भातील जाहिरातही प्रसिद्ध केली जाईल. यामाध्यमातून पोलीस दलालाही नवी ऊर्जा मिळणार असून पोलीस दलाची ताकदही वाढणार असल्याचाविश्वास व्यक्त केला जातोय. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊ आता जवळपास एक वर्ष होत आले, गेल्या एक वर्षाहून अधिक काळापासून तरूण पोलीस भरतीची वाट पाहत आहेत. त्यामुळे पोलीस भरतीचा निर्णय कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. त्यानंतर या बातमीने तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीनगरमधून ऑनलाईन सहभागी होतील. दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेही या बैठकीला अनुपस्थित राहणार आहेत.रायगड जिल्ह्यात 15 ऑगस्टला ध्वजारोहणाचा मान आदिती तटकरेंना देण्यात आल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांना मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भरत गोगावले नाराज होऊन दिल्लीला गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, गोगावले यांनी दिल्लीत काही काम असल्याने बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे सांगत नाराजीच्या बातम्या फेटाळून लावल्या.
अधिकृत संकेतस्थळांवर (उदा. Maharashtra Police Recruitment पोर्टल) ही भरती कधी, कशी आणि कुठे सुरू होईल, याची प्रकाशित जाहिरात बघत रहा. अधिकार्यांच्या सूचना वाचणे: न्यायालयीन नोटीस आणि सरकारी निर्णयांबाबत पुढील माहिती मिळवत रहा, ज्यामुळे भरतीच्या तारखा आणि प्रक्रिया स्पष्ट होतील.