एसपीजेआयएमआर पीजीपीडीएम बॅच २६ साठी आत्ताच अर्ज करा (फोटो सौजन्य-X)
मुंबई : भारतीय विद्या भवनच्या एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (एसपीजेआयएमआर)ने घोषणा केली आहे की, त्यांच्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन डेव्हलपमेंट मॅनेजमेंट (पीजीपीडीएम)च्या बॅच २६ साठी प्रवेश प्रक्रिया ३० जून २०२५ रोजी बंद होईल. ही सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा काम करण्याची इच्छा असलेल्या प्रोफेशनल्सकरिता जागतिक स्तरावर मान्यताकृत प्रोग्रामसाठी अर्ज करण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. हा प्रोग्राम धोरणात्मक नेतृत्व घडवण्यासाठी आणि सामाजिक प्रभाव वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. बॅचला ऑगस्ट २०२५ मध्ये सुरूवात होईल.
पीजीपीडीएम हा जागतिक सर्वोत्तमतेचे प्रतिष्ठित ‘ट्रिपल क्राऊन’ ईक्यूयूआयएस, एएसीएसबी आणि एएमबीएद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताकृत असलेला भारतातील एकमेव डेव्हपमेंट मॅनेजमेंट प्रोग्राम आहे. हा प्रोग्राम शैक्षणिक सर्वोत्तमता आणि व्यावहारिक अध्ययनाचे अद्वितीय संयोजन देतो, जो सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रोफेशनल्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०११ मध्ये सुरू झाल्यापासून पीजीपीडीएमने भारतातील २६ राज्यांमधील ३५० हून अधिक संस्थांवर मोठ्या प्रमाणात प्रभाव घडवून आणला आहे.
“सीएसआर निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असली तरी त्या निधीचा योग्यरित्या वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांमध्ये अजूनही वाढ झालेली नाही, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. अपेक्षा व निष्पत्तींमधील या तफावतीमुळे सामाजिक क्षेत्रात क्षमता निर्माण करण्याची आवश्यकता आहे,” असे एसपीजेआयएमआरच्या पीजीपीडीएमचे अध्यक्ष प्रो. तनोजकुमार मेश्राम म्हणाले. ते पुढे म्हणाले, “एसपीजेआयएमआरमध्ये आमचे मॉड्युलर पीजीपीडीएम समकालीन सामाजिक कार्य आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन तत्त्वांमधील तफावत दूर करते. आम्ही आमच्या पुढील कोहर्टचे स्वागत करण्यासाठी सज्ज असताना शाश्वत सामाजिक प्रभावाला गती देण्याप्रती कटिबद्ध उत्कट चेंजमेकर्सशी संलग्न होण्यास उत्सुक आहोत.”
पीजीपीडीएम हा १२ महिन्यांचा मॉड्युलर प्रोग्राम आहे, जो सहभागींना सामाजिक परिवर्तनाला गती देण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये व पैलूंसह, तसेच मिश्रित सिद्धांतासह वास्तविक विश्वातील त्यांचा उपयोग करण्याच्या क्षमतेसह सक्षम करतो. या प्रोग्रामची संरचना सहभागींना काम व शैक्षणिक प्रगतीमध्ये संतुलन राखण्यास मदत करते. तसेच हा प्रोग्रॅम सहा संपर्क कालावधीदरम्यान ३० अभ्यासक्रम देतो. यामध्ये ऑन-कॅम्पस व ऑनलाइन लर्निंग मॉड्यूल्सचा समावेश आहे. एसपीजेआयएमआरच्या मुंबई कॅम्पसमध्ये पहिल्या, तिसऱ्या व अंतिम संपर्कांचे आयोजन केले जाते, जेथे सहभागींना सखोल शिकण्याची व नेटवर्किंगची देखील संधी मिळते.
हा प्रोग्राम सध्या एनजीओ, फाउंडेशन, सामाजिक उपक्रम व सीएसआर भूमिकांमध्ये काम करणाऱ्या आणि नेतृत्व पदांसाठी इच्छुक असलेल्या प्रोफेशनल्ससाठी योग्य आहे. याचा फायदा सामाजिक प्रभाव निधी व्यवस्थापक, सल्लागार आणि कल्याणकारी व धोरणात्मक उपक्रमांवर काम करणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील आणि सरकारी अधिकाऱ्यांना देखील होतो.
विकास क्षेत्रामधील नेतृत्व पदांवरून अर्थपूर्ण पदोन्नतीचा प्रयत्न करत असलेल्या इतर क्षेत्रांतील करिअरच्या मध्य टप्प्यावर असलेल्या प्रोफेशनल्सना पीजीपीडीएम परिवर्तनात्मक व्यासपीठ वाटेल. अभ्यासक्रम नाविन्यता, स्केलेबिलिटी, प्रभाव आणि शाश्वततेवर लक्ष केंद्रित करतो, तसेच एसडीजी व ईएसजीवर भर देतो, पदवीधरांना क्षेत्रातील विद्यमान व भावी मागण्यांची पूर्तता करण्यास सक्षम करतो. पीजीपीडीएमचे माजी विद्यार्थी सामाजिक प्रभाव परिसंस्थेमध्ये संस्थापक, प्रमुख, विश्वस्त, संचालक, सीएसआर व्यवस्थापक, प्रोग्राम अधिकारी आणि सल्लागार या पदांवर आहेत.
● मान्यताकृत युनिव्हर्सिटीमधून कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.
● किमान दोन वर्षांचा संबंधित पूर्ण-वेळ कामाचा अनुभव असावा.
● संगणकामध्ये मुलभूत प्राविण्यता असावी, तसेच शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असले पाहिजे.
● फक्त शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
● प्रायोजित उमेदवारांनी अर्जासोबत प्रायोजक संस्थेचे समर्थन पत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.
संभाव्य उमेदवारांना प्रोग्रामबाबत तपशीलवार माहितीसाठी आणि अंतिम मुदत ३० जून २०२५ पूर्वी अर्ज सबमिट करण्यासाठी एसपीजेआरएमआर ऑफिशियल वेबसाइट https://spjimr.org/pgpdm-admissions/ ला भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चौकशीसाठी पीजीपीडीएम टीमला ०२२-६२१३४४४४ या क्रमांकावर संपर्क साधा किंवा admissions.pgpdm@spjimr.org येथे ईमेल करा. दीर्घकालीन सामाजिक परिणाम घडवून आणणारे करिअर घडवण्याच्या दिशेने पाऊल उचला.