गेल्या महिन्यात इयत्ता १२ विचा निकाल जाहीर झाला. सगळ्या विद्यार्थ्यांना आतुरता होती ती म्हणजे ‘MHT CET’ च्या निकालाची. २०२५ -२६ साठी घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या ‘एमएचटी सीईटी’ परीक्षा घेण्यात आली होती. आता आज म्हणजे १६ जून (सोमवारी) पीसीएम (PCM) गटाचा निकाल जाहीर झाला आहे. तर पीसीबी (PCB) गटाचा निकाल उद्या म्हणजेच १७ जूनला जाहीर होणार आहे. चला जाणून घेऊया कोणतया वेबसाईट वर जाहीर निकाल होणार, कधी आणि कसा बघता येईल?
देशात दरवळणार रोजगाराचा सुगंध! ‘युसूफभाई परफ्युम’ पुरवणार हजारो नोकऱ्या
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (State Common Entrance Test Cell) शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता ही परीक्षा घेतली. त्यापैकी ‘एमएचटी सीईटी’ (MHT CET) ही महत्त्वाची परीक्षा आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. पीसीएम आणि पीसीबी गटांसाठी ही सामाईक परीक्षा होती. पीसीएम गटाचा निकाल आज (१६ जून) ला जाहीर झाला आहे. ‘एमएचटी सीईटी’ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरांवर आक्षेप नोंदवण्याची संधी मिळाली होती. पीसीएम गटासाठी 21 मे पर्यंत आक्षेप नोंदवण्याची मुदत होती. तर पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी 18 मे पर्यंत आक्षेप नोंदवण्याची मुदत होती.
एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल कुठे पाहता येईल?
https://cetcell.mahacet.org/ या वेबसाईटवर तुम्हाला निकाल पाहायला मिळेल.
कसा पाहता येणार निकाल?
सगळ्यात आधी तुम्ही वर दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करा.
तिथे तुम्हाला MHT-CET 2025 Results असं दिसेल.
त्यानंतर तिथे तुम्हाला ‘PCM Group’ आणि ‘PCB Group’ असं दिसेल.
ज्या विषयाचा निकाल पाहायचा आहे त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगील करा.
तिथे तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
तुम्ही स्कोअरकार्डची प्रिंटही काढू शकता.
NEET UG Result 2025: नीट युजी 2025 चा निकाल कधीही होऊ शकतो Active, अशी तपासा गुणपत्रिका