
फोटो सौजन्य - Social Media
Grammarly
आपण जेव्हा नवीन विद्यार्थी म्हणून इंग्रजी शिकतो अशावेळी सगळ्यात जास्त चुका होतात त्या व्याकरणात! Grammarly हा Mobile App आपले व्याकरण सुधारतो. आपण जेव्हा आपल्या Desk वर इंग्रजीत सराव म्हणून काही लिहत असलो आणि त्यात काही Grammer Mistakes असतील तर Grammarly हे मोबाईल Apps व्याकरणाच्या चुका सुधारते आणि लेखन अधिक प्रभावी बनवते. Chrome, Firefox, Safari आणि Edge साठी याचे ब्राउझर एक्स्टेंशन उपलब्ध आहेत. अँड्रॉइड आणि आयफोनसाठी ग्रामरली कीबोर्ड वापरता येतो.
असे अनेक Mobile Apps आपल्याला मिळून जातात. त्यापैकी एक म्हणजे:
Learn English in Marathi
मराठी भाषेत इंग्रजी शिकण्यासाठी हा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. मुळात, हे App वैशिष्ट्यपूर्ण आहे. या App मध्ये मूलभूत व्याकरण उपल्बध आहे, त्याचबरोबर उत्तम शब्दसंग्रहदेखील उपल्बध आहे. तसेच वाक्यरचनेसहित संपूर्ण माहिती या App वर भेटून येते. या Mobile App मध्ये सगळ्या मॉडेल व्हर्ब्सचे धडे पुरवण्यात आले आहेत तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नार्थक शब्दांचे धडेही गिरवता येणार आहे. मुख्यतः, येथे स्वतः बोलण्याचा सराव करता येतो.
असे अनेक App मोबाईलवर मिळून जातात. आपण आपल्या सोयीनुसार त्याची निवड करावी आणि शून्य रुपये खर्चात दर्जाची आणि स्पष्ट इंग्रजी भाषा शिकून घ्यावी.