Ashoka University Undergraduate Admissions 2027 च्या पदवीपूर्व प्रवेशाला सुरुवात; 500 शिष्यवृत्तींची घोषणा, 20 जानेवारी अंतिम मुदत

Ashoka University Undergraduate Admissions 2027
Photo - Social Media
Ashoka University Undergraduate Admissions 2027 Ashoka University Undergraduate Admissions 2027
Published on: 
Updated on: 
  • उच्च शिक्षणासाठी ५०० शिष्यवृत्तींची संधी!

  • अशोका विद्यापीठात २०२७ च्या प्रवेशासाठी अर्ज सुरू

  • पाहा महत्त्वाच्या तारखा

Ashoka University Undergraduate Admissions 2027 : भारतातील आघाडीचे आंतरविद्याशाखीय आणि संशोधनावर आधारित असलेले अशोका विद्यापीठ 2027 च्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज मागवत असून, दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 जानेवारी 2027 आहे. आगामी शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठामार्फत गुणवत्ता आणि गरजेवर आधारित एकूण 500 शिष्यवृत्ती दिल्या जाणार आहेत. यामध्ये संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित विषयांत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या 50 अशोका नॅशनल सायन्स टॅलेंट शिष्यवृत्तीचा समावेश आहे. देशभरातील विविध पार्श्वभूमीच्या गुणवान विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या विद्यापीठाच्या वचनबद्धतेला यातून पुन्हा एकदा दुजोरा मिळतो.

2026-27 च्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र आणि नैसर्गिक विज्ञान क्षेत्राकडे वळण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या विज्ञान शिष्यवृत्ती उपक्रमाचा उद्देश असामान्य शैक्षणिक क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करणे आणि आंतरविद्याशाखीय शिक्षणाच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील संधी शोधण्यासाठी अधिक विद्यार्थ्यांना प्रेरित करणे हा आहे.

मागील प्रवेश प्रक्रियेत (2026 बॅच) विद्यापीठाचा वाढता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विस्तार दिसून आला; यामध्ये 16 देश, भारतातील 26 राज्ये आणि 162 शहरांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. तसेच भारतातील 472 शाळांसह एकूण 509 शाळांमधील विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश घेतला.

सर्वसमावेशकता आणि समान संधी देण्याच्या विद्यापीठाच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब 2026 च्या बॅचमध्येही पाहायला मिळाले. या बॅचमध्ये आपल्या कुटुंबातून पहिल्यांदाच महाविद्यालयात जाणारे 89 विद्यार्थी आणि अध्ययन अक्षमता, आकलनविषयक, शारीरिक, मानसिक आरोग्य आणि श्रवणविषयक विशेष गरजा असलेले 33 विद्यार्थी सहभागी झाले होते. दर्जेदार शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या आपल्या ध्येयाला अधिक बळकटी देत, विद्यापीठाने 2026 च्या बॅचमधील 40 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना गरजेवर आणि गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती प्रदान केल्या.

महाराष्ट्रातील विद्यार्थी हे अशोका विद्यापीठाच्या वैविध्यपूर्ण पदवीपूर्व विद्यार्थी समुदायाचा एक महत्त्वाचा भाग राहिले आहेत. मागील प्रवेश प्रक्रियेत, महाराष्ट्रातील सुमारे 20% विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला, ज्यातून या भागातील विद्यार्थ्यांचा आंतरविद्याशाखीय उच्च शिक्षणाकडे वाढता कल दिसून येतो. आगामी प्रवेश सत्रासाठी 500 गुणवत्ता आणि गरजेवर आधारित शिष्यवृत्ती उपलब्ध असल्याने, राज्यातील अधिकाधिक इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची माहिती घ्यावी आणि 20 जानेवारीच्या दुसऱ्या फेरीच्या अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करावा, यासाठी अशोका विद्यापीठ प्रोत्साहन देत आहे.

2027 च्या पदवीपूर्व प्रवेश प्रक्रियेची प्रमुख वैशिष्ट्ये

अशोका विद्यापीठ आपल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी एकूण 500 शिष्यवृत्ती देणार आहे, ज्यामध्ये 300 गरजेवर आधारित आणि 200 गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्तींचा समावेश आहे. आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणाच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये याची खात्री करतानाच, शैक्षणिक गुणवत्तेला पाठबळ देण्याची विद्यापीठाची निरंतर वचनबद्धता या उपक्रमातून दिसून येते.

200 गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्तींची विभागणी खालीलप्रमाणे असेल:

अ. अशोका नॅशनल सायन्स टॅलेंट शिष्यवृत्ती (50)

पूर्वी 'स्पेशल मेरिट स्कॉलरशिप' म्हणून ओळखली जाणारी ही 'अशोका नॅशनल सायन्स टॅलेंट शिष्यवृत्ती' अशोका विद्यापीठात संगणकशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित विषयात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या 50 गुणवान विद्यार्थ्यांना दिली जाईल. आंतरविद्याशाखीय पदवीपूर्व शिक्षणाद्वारे नैसर्गिक विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा शोध घेण्यासाठी प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

ब. गुणवत्ता शिष्यवृत्ती (150)

'अशोका नॅशनल सायन्स टॅलेंट शिष्यवृत्ती' व्यतिरिक्त, विद्यापीठ उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी आणि क्षमता दाखवणाऱ्या 150 विद्यार्थ्यांना गुणवत्तेवर आधारित शिष्यवृत्ती देईल. या शिष्यवृत्ती खालीलपैकी कोणत्याही एका निकषावर आधारित दिल्या जातील:

• सीबीएसई/आयएससी परीक्षेतील कामगिरी आणि अशोका विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेतील कामगिरी

• 'अशोका मॅथेमॅटिक्स चॅलेंज'मधील कामगिरी आणि अशोका विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेतील कामगिरी

गरजेवर आधारित शिष्यवृत्ती (300)

विद्यापीठाकडून आर्थिक मदतीची आवश्यकता असलेल्या प्रवेशित विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात 100% पर्यंत सूट किंवा संपूर्ण शुल्क माफी उपलब्ध असेल. अपेक्षित शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जवळच्या कुटुंबाकडे उपलब्ध असलेली आर्थिक संसाधने—जसे की सध्याचे उत्पन्न, बचत, गुंतवणूक आणि शैक्षणिक कर्ज—यांच्या आधारे विद्यार्थ्याची शुल्क भरण्याची क्षमता तपासली जाते. अभ्यासक्रमाचा खर्च आणि विद्यार्थ्याची शुल्क भरण्याची क्षमता यांतील तफावत भरून काढण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत पुरवणे, हा आमचा प्रयत्न आहे.

विद्यापीठाने आतापर्यंत 854 कोटी रुपये किमतीच्या शिष्यवृत्ती दिल्या असून, याचा लाभ 5,900 हून अधिक विद्यार्थ्यांना झाला आहे. किंबहुना, कॅम्पसमधील 42 टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते, जे विविध आर्थिक पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या विद्यापीठाच्या निरंतर वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

अर्ज वेळापत्रक

2027 च्या पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठीचे अर्ज 7 ऑक्टोबर 2026 रोजी सुरू झाले आहेत. प्रवेश प्रक्रिया अनेक फेऱ्यांमध्ये पार पाडली जात असून, दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 20 जानेवारी 2027 आहे.

इच्छुक विद्यार्थी अर्ज प्रक्रिया, पात्रता अटी, पदवीपूर्व अभ्यासक्रम आणि शिष्यवृत्ती यांबाबत अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

अशोका विद्यापीठ, दिल्ली एनसीआर विषयी:

अशोका विद्यापीठ हे नैसर्गिक विज्ञान, सामाजिक शास्त्रे आणि मानव्यविद्या या क्षेत्रांत जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध करून देणारे एक अग्रगण्य आंतरविद्याशाखीय उच्च शिक्षण आणि संशोधनावर आधारित संस्थान आहे. विविध क्षेत्रांतील नेते, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवी दात्यांनी 2014 मध्ये याची स्थापना केली. हे विद्यापीठ सामूहिक लोककल्याणकारी निधीच्या एका आगळ्यावेगळ्या मॉडेलवर चालते, ज्यामध्ये सर्वोत्तम प्रशासन पद्धती, अत्याधुनिक अध्यापनशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या प्राध्यापकांचा संगम साधला गेला आहे.

आज विद्यापीठात 3,000 हून अधिक विद्यार्थ्यांचा समुदाय आहे आणि येथे 20 हून अधिक समर्पित 'सेंटर्स ऑफ एक्सलन्स' कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य आणि रोग नियंत्रण, ऊर्जा संक्रमण, समाजाचे डिजिटायझेशन आणि महिला सक्षमीकरण यांसह सार्वजनिक धोरणाच्या इतर अनेक क्षेत्रांत प्रभावी संशोधन आणि उपाययोजना केल्या जातात.

विद्यापीठाचा विद्यार्थी वर्ग सर्वसमावेशकता आणि विविधतेच्या मूळ तत्त्वांचे प्रतिबिंब दर्शवतो; येथे भारतातील प्रत्येक राज्यातील विद्यार्थी, तसेच 4% आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, प्रत्येक सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतील विद्यार्थी, 100 हून अधिक दिव्यांग विद्यार्थी आणि अशोकाद्वारे दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीवर शिक्षण घेणारे 42% विद्यार्थी आहेत. हे हरियाणा खाजगी विद्यापीठ कायदा (2006) अंतर्गत स्थापन झालेले एक नॉन-प्रॉफिट विद्यापीठ आहे.

Photo - Social Media
Sinhagad Medical College: कोट्यावधींचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे काय? हायकोर्टाचा संताप!