Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स (BNYS)! पात्रता, प्रवेश प्रक्रिया आणि संधी

बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स (BNYS) हा आरोग्य क्षेत्रातील लोकप्रिय होत असलेला पॅरामेडिकल कोर्स आहे. बारावी विज्ञान (PCB) उत्तीर्ण आणि किमान ६०% गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 31, 2026 | 04:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

नैसर्गिक उपचारपद्धती आणि योग यांचे महत्त्व वाढत असताना बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी आणि योगिक सायन्स (BNYS) हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे. आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम आणि भविष्याभिमुख पर्याय मानला जातो.

बी.एचएमसीटी/BCA/BBA/ BBM/BMS सीईटीसाठी 71063 विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार, दुरुस्तीसाठी ऑनलाईन सुविधा

या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून बारावी विज्ञान शाखा (PCB – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. गुणवत्तेच्या आधारे प्रवेशासाठी किमान ६० टक्के गुण अपेक्षित असतात. तसेच इंग्रजी विषयाचे ज्ञान आवश्यक आहे. प्रवेशासाठी किमान वय १७ वर्षे असणे गरजेचे आहे.

प्रवेश प्रक्रिया :

BNYS कोर्समध्ये प्रवेश दोन पद्धतींनी दिला जातो. पहिली म्हणजे गुणवत्तेच्या आधारे (Merit Based), ज्यामध्ये बारावीतील गुणांनुसार संस्था गुणवत्ता यादी जाहीर करतात. दुसरी म्हणजे प्रवेश परीक्षेद्वारे (Entrance Exam), ज्यामध्ये संस्था, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा घेतली जाते. परीक्षेनंतर समुपदेशन (Counselling) प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या रँकनुसार जागा दिल्या जातात. त्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.

अर्ज प्रक्रिया :

उमेदवारांनी संबंधित संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करावी. चालू ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून लॉगिन आयडी तयार करावा. त्यानंतर अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि अर्ज शुल्क भरावे. शेवटी अर्जाची पावती भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवावी.

अभ्यासक्रमात काय शिकवले जाते?

हा एक पॅरामेडिकल कोर्स असून यात पर्यावरणशास्त्र, हृदय व रक्तवाहिनीसंबंधी प्रणाली, अॅक्युप्रेशर, मानसोपचार, योग, हायड्रोथेरपी, जेनेटिक्स, बालरोग आणि फिजिओथेरपी यांसारख्या विषयांचे सखोल ज्ञान दिले जाते. जगन्नाथ विद्यापीठ, संस्कृती विद्यापीठ, हिमालयन विद्यापीठ (इटानगर), जेएसएस इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस, मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, हिंदू बनारस विद्यापीठ, सीएमजे विद्यापीठ, सनराइज विद्यापीठ, वायबीएन विद्यापीठ आणि येनेपोया विद्यापीठ या नामांकित संस्थांमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे.

MAH-MCA CET 2026: राज्यातील १८५ केंद्रांवर परीक्षा उत्साहात; ९५.८४% विद्यार्थ्यांची विक्रमी उपस्थिती; कोणतीही तक्रार नाही

आरोग्य क्षेत्रात नैसर्गिक उपचार आणि योगाच्या माध्यमातून करिअर करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी BNYS हा कोर्स उत्तम संधी निर्माण करणारा ठरतो.

Web Title: Bachelor of naturopathy and yogic sciences bnys

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 04:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.