फोटो सौजन्य - Social Media
बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) अंतर्गत लोकल बँक ऑफिसर (Local Bank Officer, LBO) या पदांसाठी एकूण 2500 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना बँक ऑफ बडोदाने जाहीर केली असून, अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना 24 जुलै 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
शैक्षणिक पात्रता
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्नातक पदवी घेतलेली असावी. त्यासोबतच उमेदवाराकडे कोणत्याही वाणिज्यिक बँकेत किंवा क्षेत्रीय ग्रामीण बँकेत किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच, बँकेने नमूद केलेल्या इतर अटी व पात्रताही पूर्ण कराव्या लागतील.
वयोमर्यादा व सवलती
उमेदवाराची वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे इतकी असावी. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना 5 वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सवलत दिली जाणार आहे.
अर्ज फी (Application Fees)
निवड प्रक्रिया (Selection Process)
उमेदवारांची निवड लिखित परीक्षा, सायकोमेट्रिक टेस्ट आणि मुलाखत (Interview) यावर आधारित असेल.
लिखित परीक्षेत इंग्रजी, सामान्य/आर्थिक ज्ञान, बँकिंग जागरूकता, लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड यावर आधारित 120 गुणांची MCQ स्वरूपातील 120 प्रश्नांची चाचणी घेतली जाईल. परीक्षेचे कालावधी 2 तास ठेवण्यात आले आहे.
लिखित परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना पुढे ग्रुप डिस्कशन किंवा मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
अर्ज कसा करावा?
उमेदवारांना बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.