फोटो सौजन्य - Social Media
आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फक्त तंत्रज्ञानापुरते मर्यादित नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. मोबाईल फोनमधील व्हॉइस असिस्टंट, सोशल मीडियावरील रेकमेंडेशन सिस्टम, बँकिंगमध्ये फसवणूक ओळखण्याची पद्धत किंवा वैद्यकीय क्षेत्रातील डायग्नोसिस AI चा वापर प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रातील करिअर संधीही वेगाने निर्माण होत आहेत.
१२वी नंतर अनेक विद्यार्थी पारंपरिक डिग्रीसह शॉर्ट-टर्म आणि जॉब-ओरिएंटेड कोर्सेसकडेही वळत आहेत. एआयशी संबंधित कोर्सेस विद्यार्थ्यांना कमी कालावधीत कौशल्य प्राप्त करून नोकरीसाठी तयार करतात. यात फक्त प्रोग्रॅमिंगच नव्हे, तर डेटा अॅनालिसिस, मशीन लर्निंग, रोबोटिक्स आणि
एआय टूल्सचे प्रॅक्टिकल ट्रेनिंगही दिले जाते. पाहूया, असे पाच कोर्सेस जे विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देऊ शकतात.
डिप्लोमा इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स
हा एआयचा सुरुवातीचा कोर्स असून १२वी नंतर विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय आहे. यात एआयचे मूलभूत संकल्पना, मशीन लर्निंग, डेटा प्रोसेसिंग आणि पायथन प्रोग्रॅमिंग शिकवली जाते. हा कोर्स साधारणपणे १ ते १.५ वर्षांचा असतो. यानंतर विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावरील नोकऱ्यांची संधी मिळते.
सर्टिफिकेट कोर्स इन मशीन लर्निंग
कंप्युटर आणि गणिताची आवड असणाऱ्यांसाठी हा कोर्स उत्तम आहे. यात डेटा पॅटर्न ओळखणे, मॉडेल तयार करणे आणि प्रेडिक्शन करणे शिकवले जाते. कोर्स कालावधी ६ महिने ते १ वर्ष असतो. हा कोर्स पूर्ण केल्यावर डेटा अॅनालिस्ट किंवा एमएल असिस्टंटसारख्या नोकऱ्यांसाठी दारे खुली होतात.
बी.एस्सी. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स
ही एक फुल-फ्लेज्ड डिग्री असून कालावधी ३ वर्षे असतो. यात एआयसह डेटा सायन्स, बिग डेटा अॅनालिटिक्स, न्युरल नेटवर्क आणि डीप लर्निंगचे सखोल ज्ञान दिले जाते. हा कोर्स पूर्ण झाल्यावर विद्यार्थी आयटी, हेल्थकेअर, फायनान्स आणि रिसर्चसारख्या क्षेत्रात चांगल्या नोकऱ्या मिळवू शकतात.
डिप्लोमा इन रोबोटिक्स अँड एआय
मशीन आणि हार्डवेअरशी संबंधित काम करण्याची आवड असणाऱ्यांसाठी हा कोर्स आदर्श आहे. यात रोबोटिक्स, ऑटोमेशन, मशीन लर्निंग आणि एआयचे प्रॅक्टिकल ज्ञान दिले जाते. आजच्या औद्योगिक क्षेत्रात रोबोटिक्सची मोठी मागणी असल्यामुळे करिअरच्या संधी प्रचंड वाढतात.
सर्टिफिकेशन इन नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP)
NLP हा एआयचा असा विभाग आहे ज्यात मशीनला मानवी भाषा समजून प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षण दिले जाते. चॅटबॉट्स, व्हॉइस असिस्टंट्स आणि ट्रान्सलेशन टूल्स याच तंत्रज्ञानावर चालतात. या कोर्सचा कालावधी साधारण ६ महिने ते १ वर्ष असतो. त्यानंतर विद्यार्थी NLP डेव्हलपर किंवा एआय रिसर्च असिस्टंट म्हणून करिअर करू शकतात.
एकंदरीत, एआय ही भविष्यातील सर्वात महत्त्वाची टेक्नॉलॉजी ठरणार आहे. योग्य कोर्सची निवड करून आणि स्किल्स विकसित करून विद्यार्थी कमी कालावधीत उत्तम पॅकेजवर नोकरी मिळवू शकतात.