Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नववर्षाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर! पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्यात आले पुस्तकांचे वितरण

विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांचा शैक्षणिक, वैचारिक व बौद्धिक विकास घडतो, असा विश्वास पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 03, 2026 | 03:51 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यातून त्यांचा शैक्षणिक, वैचारिक आणि बौद्धिक विकास घडतो, असा विश्वास पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी व्यक्त केला. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मराठी वाचनसंस्कृती अधिक समृद्ध करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ‘पुस्तक पेटी भेट’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मनोविकास ग्रंथोत्सव आणि पालघर साहित्य व कला प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच निऑन फाउंडेशनच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या हस्ते विविध शाळांना वाचनीय पुस्तकांच्या पेट्यांचे वितरण करण्यात आले.

सुकाणू समितीची स्थापना; शिक्षकभरतीची जबाबदारी राज्य परीक्षा परिषदेकडेच

या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, तहसीलदार सचिन भालेराव, पालघर साहित्य व कला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश लवेकर, सचिव अमोल पाटकर, खजिनदार राहुल ठाकूर, निऑन फाउंडेशनच्या संध्या पाटील, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रमोद पाटील यांच्यासह विविध शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा रोडखड, दाभोण (पिलेना पाडा), टेम्भीखोडावे, घाटीम, कर्दळ, आर्यन, अभिनव विद्यालय विराधन बुद्रुक तसेच आंभाण मनोर येथील जिल्हा परिषद व संस्थेच्या शाळांना पुस्तकांच्या पेट्या वितरित करण्यात आल्या. या पुस्तकांमध्ये बालसाहित्य, कथासंग्रह, सामान्य ज्ञान, विज्ञानविषयक तसेच प्रेरणादायी पुस्तके यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता वाचनाच्या माध्यमातून त्यांचे ज्ञानविश्व अधिक व्यापक व्हावे, या उद्देशाने ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार वाचनसामग्री मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले. पुस्तक पेट्यांचे वितरण करताना जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले. “ही पुस्तके केवळ कपाटात बंद करून न ठेवता विद्यार्थ्यांना मुक्तपणे वाचनासाठी उपलब्ध करून द्यावीत. नियमित वाचनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, भाषिक कौशल्य आणि आत्मविश्वास वाढतो,” असे त्या म्हणाल्या.

सामान्यज्ञान स्पर्धेत ५०० विद्यार्थी सहभागी! पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली १०० गुणांची स्पर्धा

अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

Web Title: Book distrubation at schools of palghar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • book reading
  • palghar

संबंधित बातम्या

Antyodaya Saree Scheme : अंत्योदय योजनेतील साड्यांचा निकृष्ट दर्जा; महिलांनी नेसण्याऐवजी कुंपणाला लावल्या
1

Antyodaya Saree Scheme : अंत्योदय योजनेतील साड्यांचा निकृष्ट दर्जा; महिलांनी नेसण्याऐवजी कुंपणाला लावल्या

Farmers Crop Loan Issue : कागदपत्रांवर सह्या घेतल्या कर्ज दिलंच नाही! खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त, पोलिसांत धाव
2

Farmers Crop Loan Issue : कागदपत्रांवर सह्या घेतल्या कर्ज दिलंच नाही! खोडाळा आदिवासी सेवा सोसायटीतील शेतकरी संतप्त, पोलिसांत धाव

Vadhavan Port Protest : भर उन्हात ५०० हून अधिक पोलीस अन् हजारो भूमिपुत्र आमनेसामने! वाढवण बंदरविरोधात वरोरमध्ये आंदोलन पेटले
3

Vadhavan Port Protest : भर उन्हात ५०० हून अधिक पोलीस अन् हजारो भूमिपुत्र आमनेसामने! वाढवण बंदरविरोधात वरोरमध्ये आंदोलन पेटले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.