दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!
CBSE Exam Date Sheet 2026: केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (CBSE) ने २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या संभाव्य तारखांची घोषणा केली आहे. या परीक्षा १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा ९ मार्च २०२६ रोजी तर बारावीची परीक्षा ९ एप्रिल २०२६ रोजी संपणार आहे. दहावीच्या परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहेत. परीक्षेचा दुसरा टप्पा १५ मे पासून सुरू होऊन १ जून २०२६ रोजी संपेल.
First edition of CBSE Class 10 board exams to be conducted from Feb 17 to March 6, 2026; second edition from May 15 to June 1: Officials. CBSE Class 12 board exams to be conducted from Feb 17 to April 9, 2026: Exam Controller Sanyam Bhardwaj. pic.twitter.com/I7T08tVFV8 — Press Trust of India (@PTI_News) September 24, 2025
सीबीएसईच्या अधिकृत सूचनेनुसार, २०२६ मध्ये भारत आणि परदेशातील २६ देशांमधून दहावी आणि बारावीच्या २०४ विषयांमध्ये सुमारे ४५ लाख उमेदवार परीक्षा देण्याची शक्यता आहे. हे वेळापत्रक तात्पुरत्या स्वरूपाचे असून, शाळांकडून उमेदवारांची अंतिम यादी प्राप्त झाल्यानंतर अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल.
सीबीएसईने बोर्ड परीक्षांमध्ये अनेक नियम कडक केले आहेत. बोर्डाने २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी नोंदणीकृत विद्यार्थ्यांच्या आवश्यकतांवर प्रकाश टाकणारी अधिकृत सूचना जारी केली. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. अधिकृत सूचनेनुसार, परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षांसाठी ९-१० आणि ११-१२ चे सर्व विषय पूर्ण करणे आणि अभ्यास करणे आवश्यक आहे. हे आवश्यक आहे कारण दहावी आणि बारावी हे दोन वर्षांचे कार्यक्रम आहेत.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक प्रमुख पात्रता म्हणजे त्यांनी नियमित शाळेत किमान ७५ टक्के उपस्थिती राखली पाहिजे. सूचनेत म्हटले आहे की, ‘सीबीएसईने प्रस्तावित केलेल्या सर्व विषयांमध्ये अंतर्गत मूल्यांकन हा एनईपी-२०२० नुसार मूल्यांकनाचा अनिवार्य अविभाज्य भाग आहे. ही दोन वर्षांची प्रक्रिया आहे. जर एखादा विद्यार्थी शाळेत गेला नाही तर त्याचे अंतर्गत मूल्यांकन करता येणार नाही. अंतर्गत मूल्यांकनात कामगिरी न केल्यास, विद्यार्थ्याचा निकाल जाहीर केला जाणार नाही. जरी असा विद्यार्थी नियमित असला तरी त्याला आवश्यक पुनरावृत्ती श्रेणीत ठेवले जाईल.