
फोटो सौजन्य - Social Media
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2026 साली होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची डेटशीट जाहीर केली आहे. या वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा १७ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ या कालावधीत होणार आहे, तर बारावीची परीक्षा १७ फेब्रुवारी ते ९ एप्रिल २०२६ या दरम्यान पार पडेल. विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा आणि कोणत्याही विषयाच्या तारखा एकमेकांवर येऊ नयेत, म्हणून यंदा डेटशीट वेळेआधी जाहीर करण्यात आली आहे.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या तारखा:
CBSE च्या वेळापत्रकानुसार, १७ फेब्रुवारी रोजी गणित (Standard आणि Basic) परीक्षा घेण्यात येईल. २१ फेब्रुवारीला इंग्रजी (Communicative / Language and Literature), २५ फेब्रुवारीला विज्ञान, तर २६ फेब्रुवारीला गृह विज्ञानाची परीक्षा होणार आहे. २७ फेब्रुवारीला संगणक अनुप्रयोग, माहिती तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयांच्या परीक्षा होतील. २ मार्चला हिंदी कोर्स A आणि B, ५ मार्चला चित्रकला (Painting) आणि १० मार्चला भारतीय शास्त्रीय संगीत (गायन/वाद्य) परीक्षा होईल.
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा वेळापत्रक:
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी १७ फेब्रुवारीला बायोटेक्नॉलॉजी, एंटरप्रेन्योरशिप आणि संस्कृत ऐच्छिक विषयांच्या परीक्षा होणार आहेत. २० फेब्रुवारीला भौतिकशास्त्र, २८ फेब्रुवारीला रसायनशास्त्र, आणि ९ मार्चला गणित तसेच एप्लाइड गणिताची परीक्षा होईल. ११ मार्चला इंग्रजी (Elective/Core), १६ मार्चला हिंदी (ऐच्छिक/Core), १८ मार्चला अर्थशास्त्र, तर २३ मार्चला जीवशास्त्राची परीक्षा होणार आहे. १ एप्रिलला भूगोल, ४ एप्रिलला राज्यशास्त्र, ७ एप्रिलला लेखाशास्त्र (Accountancy), आणि ९ एप्रिलला पर्यावरणशास्त्राची परीक्षा घेण्यात येईल.
CBSE च्या या डेटशीटनंतर विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन आखण्यास सोपे होणार आहे. मंडळाने विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देत प्रत्येक विषयात चांगली तयारी करण्याचे आवाहन केले आहे.