'टीईटी' निर्णयाविरुद्ध शिक्षक आक्रमक (Photo Credit -X)
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे भविष्य अंधारात सापडण्याची भीती निर्माण झारली आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने तातडीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य सरकारला निवेदन सादर करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तामिळनाडू राज्य शासनाने तेथील साडेतीन लाख शिक्षकांसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचा दाखलाही समितीने राज्य सरकारला दिला आहे.
समितीने म्हटले आहे कि, टीईटी बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांच्या पदोन्नत्या रोखण्यात आल्या आहेतु, तर काही ठिकाणी वरिष्ठ निवड श्रेणीसाठीही टीईटी उत्तीर्ण होण्याची अट लादली जात आहे. यासोबतच, इतर मागास बहुजन कल्याण लातूरच्या सहाय्यक संचालकानी पाच वर्षांहून अधिक सेवा झालेल्या आणि ‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन काढू नये, अशा आशयाचे पत्र निर्गमित केल्यामुत्रों प्राथमिक शिक्षकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि संताप वसरता आहे.
स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या या अन्यायकारक कारवाईमुळे शिक्षक मानसिक आणि शारीरिक तणावाखाली असल्याचे शिक्षक समितीचे म्हणणे आहे. तातडीने पुनर्विलोकन याचिका दाखल करावी, संचमान्यता शासन निर्णय रद्द करावा. शिक्षण सेवक पद्धती बंद करून पूर्ण वेतनावर नियमित नियुक्ती करावी. पूर्वाश्रमीच्या वस्तीशाळा शिक्षकांच्या मागण्यांची सोडवणूक करावी ऑफलाईन ऑनलाईन कामे बंद करावी. बीएलओ कामातून शिक्षकांची मुक्तता करावी. या मागण्प्यांवर शासनाने तातडीने अनुकूल निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला आंदोलनाचा पवित्रा घेणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आल्याचे समितीने कळवले आहे.
आश्वासनानंतरही शासन सुस्त, दखल नाही






