Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विद्यार्थ्यांच्या तणाव व्यवस्थापनासाठी CBSE चा उपक्रम! करिअर मार्गदर्शन डॅशबोर्ड व हब-अँड-स्पोक मॉडेलमुळे विद्यार्थ्यांचा फायदा

सीबीएसईने करिअर मार्गदर्शन डॅशबोर्ड आणि हब अँड स्पोक मॉडेलद्वारे विद्यार्थ्यांना करिअर नियोजनासोबतच मानसिक आरोग्य व तणाव व्यवस्थापनासाठी मदत उपलब्ध करून दिली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 02, 2025 | 05:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौकटीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोठी पावले उचलली आहेत. याअंतर्गत यंदापासून दोन महत्त्वाचे उपक्रम देशभरातील शाळांमध्ये राबवले जाणार आहेत. करिअर मार्गदर्शन डॅशबोर्ड आणि हब अँड स्पोक शालेय प्रारूप. या दोन उपक्रमांचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक यश मिळविणे नव्हे, तर त्यांना भविष्यात योग्य दिशा मिळावी, तणावाचे व्यवस्थापन करता यावे आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आवश्यक आधार उपलब्ध करून देणे हा आहे.

Railway Recruitment: 2000 पेक्षा अधिक जागांवर भरती! परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, कशी ते घ्या जाणून

हब अँड स्पोक प्रारूप या संकल्पनेनुसार, काही निवडक शाळा ‘हब’ म्हणून नियुक्त केल्या जातील. या शाळांमध्ये विशेष प्रशिक्षित समुपदेशक व करिअर मार्गदर्शक उपलब्ध असतील. त्या परिसरातील इतर शाळा ‘स्पोक’ म्हणून या हब शाळांशी जोडल्या जातील. हब शाळांतील समुपदेशक संबंधित स्पोक शाळांतील विद्यार्थ्यांना करिअर निवडीचे पर्याय समजावून सांगतील, त्यांना मानसिक आरोग्य व तणाव व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करतील आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सहाय्य करतील. अशा प्रकारे ग्रामीण व दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन सहज मिळू शकेल.

हा उपक्रम ऑगस्ट 2025 पासून टप्प्याटप्प्याने देशभर सुरू होईल. यात शाळांची अधिकृत नोंदणी, शिक्षकांचे विशेष प्रशिक्षण, समुपदेशन सत्रांचे आयोजन आणि करिअर मेळाव्यांचे नियोजन केले जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना करिअर निवडीसाठी व्यापक दृष्टीकोन मिळेल तसेच शिक्षक व समुपदेशकांची क्षमता वाढेल. शाळांमध्ये समुपदेशन संस्कृती रुजवणे आणि सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांना समान संधी देणे हे या उपक्रमाचे प्रमुख ध्येय आहे. करिअर मार्गदर्शन डॅशबोर्ड हा एक अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म असून, तो इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी 1,100 हून अधिक करिअर पर्यायांची सविस्तर माहिती उपलब्ध करून देतो. प्रत्येक करिअरसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्ये, उच्च शिक्षणाच्या संधी, रोजगाराच्या शक्यता यांचे तपशीलवार वर्णन यात दिलेले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय चाचण्या, वैयक्तिक समुपदेशन, प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती आणि महाविद्यालयांची माहिती या डॅशबोर्डवर मिळेल. हा प्लॅटफॉर्म सर्व सीबीएसई शाळांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध असून cbsecareerguidance.com या संकेतस्थळावर नोंदणी करून याचा लाभ घेता येईल.

LIC मध्ये अप्रेन्टिस पदासाठी करा अर्ज! 192 जागा रिक्त, ‘या’ तारखेपर्यंत विंडो ओपन

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना करिअर नियोजनास स्पष्ट दिशा मिळणार आहे, तसेच त्यांचे मानसिक आरोग्य मजबूत राहण्यासाठी आवश्यक आधारही मिळेल. सीबीएसईचे हे पाऊल विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Web Title: Cbses initiative for students stress management launch career guidance dashboard and hub and spoke model

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • CBSE

संबंधित बातम्या

CBSE Supplementary Exams 2025: सीबीएसई बोर्डाच्या १०वी-१२वी पुरवणी परीक्षा उद्यापासून; प्रवेशपत्र जारी
1

CBSE Supplementary Exams 2025: सीबीएसई बोर्डाच्या १०वी-१२वी पुरवणी परीक्षा उद्यापासून; प्रवेशपत्र जारी

दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार , CBSE बोर्डाचा निर्णय
2

दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार , CBSE बोर्डाचा निर्णय

CBSE विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! South Asian University, दिल्लीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू
3

CBSE विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! South Asian University, दिल्लीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

CBSE मध्ये कनिष्ठ सहाय्यक आणि अधीक्षक पदांची भरती; Answer Key जाहीर
4

CBSE मध्ये कनिष्ठ सहाय्यक आणि अधीक्षक पदांची भरती; Answer Key जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.