फोटो सौजन्य - Social Media
LIC ने नवीन भरतीला सुरुवात केली आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. या भरतीच्या माध्यमातून १९२ जागा रिक्त आहेत त्या भरण्यात येणार आहेत. २ सप्टेंबरपासून या भरतीसाठी अर्ज स्वीकारले जात असून शेवटची मुदत २२ सप्टेंबरपर्यंत देण्यात आली आहे. या भरतीमध्ये इच्छुक असाल तर ही बातमी संपूर्ण वाचा.
या भरतीसाठी अर्ज शुल्क भरावे लागणार आहेत. General / OBC उमेदवारांसाठी ९४४ रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. SC / ST / Female प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना ७०८ रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहेत. PwBD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ४७२ रुपये निश्चित करण्यात आले आहे, तर अर्ज शुल्क ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही शैक्षणिक आणि वयोमर्यादे संदर्भात निकष पात्र करावे लागणार आहेत. किमान २० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २५ वय असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदरांना अर्ज शुल्कात काही प्रमाणात घट देण्यात येईल. शैक्षणिक अटी पाहिल्या, तर कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये तीन टप्प्यांचा समावेश आहे. लेखी परीक्षा, दस्तऐवजांची पडताळणी तसेच मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची नियुक्ती होणार आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज: