
फोटो सौजन्य - Social Media
विद्याभवन हायस्कुलमधील प्राचार्या योगिनी पोतदार यांनी संविधानाचे हक्क, जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेत घेण्यात आलेल्या स्पर्धा! शाळेत विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता वाढावी म्हणून स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. या कार्यक्रमाचे आणखीन एक विशेष आकर्षण याच दिवशी २६/११ चा हल्ला झाला होता. त्यामुळे या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व अधिकारी तसेच मृत नागिरकांना श्रद्धांजली वाहिली गेली. यादरम्यान शाळेच्या उपप्राचार्या ज्योती देसाई आणि सर्व शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते.
विक्रोळीच्या अस्मिता कॉलेज ऑफ लॉमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून DLAS मुंबई शहराचे सचिव न्यायमूर्ती पवन तपडिया उपस्थित होते; विशेष अतिथी म्हणून अॅड. प्रसाद परब यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्र्माची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला वंदन करून झाली. या दरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन झाले. त्यातील विशेष आकर्षण म्हणजे संविधानावर तयार केला गेलेला पोवाडा! तसेच संविधानावर आधारित तयार केले गेलेल्या नाटिकेलाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली आहे. सुमारे 250 विधी विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित होते.
मुंबईच्या ठिकठिकाणी असणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.