फोटो सौजन्य - Social Media
CSIR-केंद्रीय रस्ता संशोधन संस्था (CRRI) ने जाहिरात क्रमांक 06/PC/SCT-2024 अंतर्गत वैज्ञानिक गट IV (2) पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीद्वारे ट्रॅफिक इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग, पर्यावरण इंजिनिअरिंग, आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या विशिष्ट क्षेत्रांमध्ये एकूण 23 जागा भरल्या जाणार आहेत. तर या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रिया 26 डिसेंबर 2024 पासून करण्यात येणार आहे. तर उमेदवारांना 25 जानेवारी 2025 या तारखेपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट crridom.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी जर तुम्हयी अर्ज करू पाहत आहात तर नक्कीच काही पात्रता निकष आहेत, त्यांना लक्षात घेणे आणि पात्र करणे अनिवार्य आहे. हे पात्रता निकष शैक्षणिक तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. एकंदरीत, या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार ट्रॅफिक इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग किंवा पर्यावरण इंजिनिअरिंगमध्ये M.E./M.Tech असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रात Ph.D. असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. तर अधिसूचनेमध्ये वयोमर्यादे संदर्भात काही अटी शर्ती आहेत, ज्यांना पात्र असणे अनिवार्य आहे. जास्तीत जास्त ३५ वर्षे असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. SC/ST/OBC/PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत लागू करण्यात येणार आहे.
या भरतीमध्ये नियुक्तीच्या प्रक्रियेचा समावेश आहे. या नियुक्तीच्या टप्प्यांना उमेदवारांना पात्र करावे लागणार आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या आधारावर उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाणार आहे. तसेच उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. एकंदरीत, शॉर्टलिस्ट केलेले उमेदवार मुलाखतीसाठी कॉल केले जातील. उमेदवारांना अर्ज करताना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. General/ OBC/ EWS या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपयांची भरपाई करायची आहे तर SC/ ST/ PwBD/ Women/ Ex-Servicemen या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज:
1. अधिकृत वेबसाइट crridom.gov.in वर भेट द्या.
2. अर्ज फॉर्म भरून आवश्यक माहिती द्या.
3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (पासपोर्ट आकाराची छायाचित्र, स्वाक्षरी, शैक्षणिक प्रमाणपत्रे).
4. अर्ज शुल्क भरा.
5. अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रति जतन करा.