फोटो सौजन्य- सोशल मीडिया
चिपळूण तालुक्यातील डी.बी जे. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व आय. क्यु .ए. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केम- फेस्ट २०२४ ऑरबिट या महाविद्यालयीन स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा सादरीकरण कौशल्य वृद्धिंगत व्हावे तसेच रसायनशास्त्र विषयांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी केम-पोस्टर, केम-रांगोळी, केम- प्रोजेक्ट, केम-शब्दकोडे अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील एकूण १७९ विद्यार्थी सहभागी झाले होते.या विविध स्पर्धांच्या उद् घाटनासाठी न. ए. सोसायटीचे चेअरमन मा. मंगेश तांबे आणि डी.बी.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रा.माधव बापट हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. प्रा.अरुण जाधव , डॉ. एच. टी. बाबर, प्रा.सोनाली खर्चे (डी.बी.जे.कॉलेज, चिपळूण) व आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. जगदीश पिंपुटकर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. द्वितीय
केम पोस्टर या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील कालिका घाग आणि सदिक्षा सुनार प्रथम क्रमांक,अरिबा बांगी आणि जुई नरळकर द्वितीयक्रमांक, रिया गडदे आणि रुतिका शिंदे तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील साहिल खेराडे प्रथम क्रमांक, पार्थ सुतार व तृप्ती कांबळे द्वितीय क्रमांक, तन्वी म्हाडेश्वर व प्रणाली घाडीगावकर तृतीय क्रमांक संपादन केला.
केम-रांगोळी या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयात रूपाली कदम व नेहा लाकडे प्रथम क्रमांक, सानिका सुतार व श्रावणी देवघरकर द्वितीय क्रमांक, गौरी काणेकर व सानिया मोहिते तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील तृप्ती कांबळे व श्रावणी खेडेकर प्रथम क्रमांक, स्वरांगी म्हैसकर द्वितीय क्रमांक, वेणू निवाते व इरम शहा तृतीय क्रमांक संपादन केला.
केम प्रोजेक्ट या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयात खान सुफियान सैयद व मोहम्मद शाहीर कमालउद्दीन काझी प्रथम क्रमांक तेजस पाटणकर व आर्यन शेठ द्वितीय क्रमांक, अनन्या जड्याल व जुई अनिल कुमार तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील जान्हवी जाधव व इरम शाह प्रथम क्रमांक साईराज धाडवे व सुरज देशमुख द्वितीय क्रमांक अंकुर कुशवाह व ऋत्विक शेटकर तृतीय क्रमांक संपादन केला.
केम शब्दकोडे या स्पर्धेत वरील कनिष्ठ महाविद्यालयातील कु. तनिष शिरगावकर प्रथम क्रमांक, साक्षी बापट द्वितीय क्रमांक, मृण्मयी कुलकर्णी तृतीय क्रमांक संपादन केला तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील साईराज धाडवे प्रथम क्रमांक, रोहित कदम द्वितीय क्रमांक, कु. प्रीती कुमारी राव तृतीय क्रमांक संपादन केला.
तसेच बाळासाहेब माटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कामथे टेरव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आणि सुरेश दामोदर गद्रे इंग्रजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय चिपळूण या शाळेतील एकूण 193 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास भेट दिली.
पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे जगदीश पिंपूटकर, डी. बी.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बापट, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन एस तळप सर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख एस.के.जाधव, एम.टी.दलवाई व ए. वाय. पुनवतकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेच्या आयोजनासाठी रसायनशास्त्र विभागातील सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक यांचे विशेष सहकार्य लाभले.