फोटो सौजन्य - Social Media
दिल्ली सरकारच्या पर्यावरण विभागाअंतर्गत कार्यरत दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (DPCC) कडून सहाय्यक पर्यावरण अभियंता पदांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही भरती केवळ OBC (दिल्ली) प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव विशेष मोहिमेअंतर्गत केली जाणार आहे. यामध्ये एकूण 8 पदे भरली जाणार असून मागील काही वर्षांतील बॅकलॉग रिक्त पदे भरण्यावर या मोहिमेचा भर असेल. DPCC ही एक स्वायत्त नियामक संस्था असून तिच्यावर जल अधिनियम 1974 व वायू अधिनियम 1981 अंतर्गत प्रदूषण नियंत्रण कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 30 ऑगस्ट 2025 पासून सुरू होत असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज शुल्क ठेवलेले नाही, म्हणजेच सर्व प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत राहणार आहे.
भरतीसाठी पात्रता निकषांनुसार उमेदवारांनी UPSC Engineering Services Examination (ESE) 2022 किंवा 2023 मध्ये भाग घेतलेला असावा आणि ते उमेदवार Non-Recommended यादीतील असणे आवश्यक आहे. अर्जदारांचे वय अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार 35 वर्षांपेक्षा अधिक नसावे. OBC (दिल्ली) प्रवर्गातील उमेदवारांना GNCTD व भारत सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे, तसेच शासकीय सेवकांनाही नियमांनुसार सूट दिली जाणार आहे. निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून उमेदवारांची निवड UPSC ESE 2022 आणि 2023 मधील Non-Recommended यादीवर आधारित गुणवत्तायादीद्वारे केली जाणार आहे. निवड झाल्यानंतर उमेदवारांना दस्तऐवज पडताळणी आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या भरतीमध्ये फक्त त्याच OBC (Delhi-NCL) उमेदवारांना पात्रता असेल ज्यांच्याकडे GNCTD कडून जारी केलेला वैध जात प्रमाणपत्र असेल. आधीपासूनच DPCC मध्ये OBC राखीव पदावर कार्यरत असलेले उमेदवार या संधीसाठी अर्ज करू शकणार नाहीत.
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी dpcc.delhigovt.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Office Orders & Circulars या विभागातून अर्ज फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यामध्ये आवश्यक तपशील नीट भरून, UPSC ESE रोल नंबर नमूद करून व वैध OBC दिल्ली प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावा. भरलेला अर्ज खालील पत्त्यावर पोस्टाद्वारे पाठविणे अनिवार्य आहे – प्रशासकीय अधिकारी, दिल्ली प्रदूषण नियंत्रण समिती (DPCC), तिसरा मजला, ब्लॉक-1, DMRC IT Park, शास्त्री पार्क, दिल्ली – 110053.
या भरतीत फक्त OBC (दिल्ली) उमेदवारांसाठीच संधी असून इच्छुकांनी वेळेत अर्ज सादर करून ही संधी साधून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.