
फोटो सौजन्य - Social Media
देशसेवेशी जोडलेल्या DRDO मध्ये करिअर करण्याची ही सुवर्णसंधी असून, अर्ज प्रक्रिया 9 डिसेंबर 2025 पासून DRDO च्या अधिकृत वेबसाइटवर सुरू होईल. STA-B पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील बॅचलर पदवी, इंजिनिअरिंग/टेक्नॉलॉजी/कॉम्प्युटर सायन्समधील पदवी किंवा केमिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इत्यादी संबंधित शाखांमधील डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तर Technician-A पदासाठी किमान १०वी उत्तीर्ण असणे आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे बंधनकारक ठेवण्यात आले आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून, उमेदवारांनी DRDO च्या वेबसाइटवरील Recruitment सेक्शनमध्ये जाऊन CEPTAM-11 भरतीची लिंक उघडावी. त्यानंतर नाव, जन्मतारीख, कॅटेगरी व शैक्षणिक तपशील अचूक भरून आवश्यक कागदपत्रे, फोटो व स्वाक्षरी ठरलेल्या फॉरमॅटनुसार अपलोड करावी लागतील. शेवटी आपापल्या प्रवर्गानुसार अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरून फॉर्म सबमिट करावा आणि त्याचा प्रिंटआउट भविष्यातील उपयोगासाठी सुरक्षित ठेवावा. DRDO कडून लवकरच सविस्तर नोटिफिकेशन जारी केले जाणार असून, त्यामध्ये परीक्षा पद्धती, प्रश्नपत्रिकेचा स्वरूप, सिलेबस, वयोमर्यादा, आरक्षणाचे नियम, निवड प्रक्रिया, वेतनमान, टियर-1 व टियर-2 परीक्षा, तसेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची तांत्रिक माहिती देण्यात येईल. DRDO भरती नेहमीच अत्यंत पारदर्शक आणि स्पर्धात्मक असल्याने एन्ट्री लेव्हल पदांसाठीही उमेदवारांची तयारी मजबूत असावी लागते.
देशाच्या संरक्षण संशोधनात आपले योगदान देण्याची संधी या भरतीतून मिळणार आहे. विशेष म्हणजे DRDO च्या विविध प्रयोगशाळा, तांत्रिक केंद्रे आणि संशोधन संस्थांमध्ये काम करण्याची संधी असल्याने उमेदवारांना उच्च तंत्रज्ञान, अत्याधुनिक उपकरणे आणि अनुभवी वैज्ञानिकांसोबत काम करण्याची मोठी संधी मिळते. CEPTAM-11 भरतीमुळे हजारो तरुणांना संरक्षण संशोधन क्षेत्रात प्रवेशाचा मार्ग खुला होणार असून, ही भरती सध्या देशभरातील उमेदवारांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे. इच्छुकांनी 9 डिसेंबरपासून सुरू होणारी अर्ज प्रक्रिया चुकवू नये तसेच अधिकृत नोटिफिकेशन येईपर्यंत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, ITI प्रमाणपत्रे, ओळखपत्रे आणि फोटो-सिग्नेचरची तयारी करून ठेवावी, अशी सूचना तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.