फोटो सौजन्य - Social Media
त्याच्या मित्रांवरही होणार आहे. सगळे काही त्याला सोडून जातील आणि तो एकटा पडेल! त्यामुळे त्याचे मानसिक आरोग्य वाचवणे हे आपल्याही हातात आहे. या गोष्टींना दुर्लक्ष करून मानसिक तणावामुळे नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांवर नंतर चिडण्यापेक्षा त्यांना आधीच मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या तणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र्र राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या ताण-तणावाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व क्रीडा विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये आता मानसोपचारतज्ज्ञ (Mental Health Expert) नियुक्त करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना तणावमुक्ती, मार्गदर्शन आणि समुपदेशन देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारली जाणार आहे. सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन समुपदेशन मॉड्यूल तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), पुणे यांच्या संचालकांची नियुक्ती झाली आहे. आरोग्य सेवा विभाग, पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, माध्यमिक शिक्षण मंडळ अशा विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून सहभागी असून, ही समिती तीन महिन्यांच्या आत अहवाल सरकारला सादर करणार आहे. इयत्ता ९वी ते १२वीच्या वर्गांसाठी विशेष समुपदेशन उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळणार असून शाळांमध्ये सुरक्षित, सकारात्मक आणि भावनिकदृष्ट्या अनुकूल वातावरण तयार होण्यास मदत होणार आहे.






