
फोटो सौजन्य - Social Media
डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC)ने भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. एकूण १० रिक्तपदांसाठी या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभाग घेऊ पाहणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एकंदरीत, उमेदवारांना २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC)च्या dic.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे ७५ ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती तात्काळ मंजूर
मुळात, या भरतीमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी उमेदवारांनी काही अटी शर्तींची पूर्तता करावी लागणार आहे. एकंदरीत, या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार अधिसूचनेत नमुद असलेल्या अटी शर्तीना पात्र असावा. या अटी शर्ती उमेदवाराचे शिक्षण तसेच वयोमर्यादेसंदर्भात आहेत. या १० रिक्त पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून पदवीधर असावा. एकंदरीत, उमेदवार BE, B.tech, M.tech, MBA किंवा MCA पैकी कोणत्याही एका पोग्रॅममधून पदवीधर हवा.
महत्वाची बाब अशी आहे कि कॉम्प्युटर सायन्स, AI किंवा इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये शिक्षण घेतलेले असलेल्या उमेदवारांना प्रथम प्राथमिकता देण्यात येईल. अधिसूचनेनुसार, काही ठराविक वयोगातील उमेदवारांना या भरतीमध्ये सहभाग घेता येणार आहे. अर्जकर्त्या उमेदवाराचे वय ३२ वर्षांपेक्षा कमी असणे फार गरजेचे आहे. ही नोकरी दोन वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असून नोकरीचे ठिकाण दिल्ली आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती, उमेदवारांनी तात्काळ करा अर्ज
या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या होणाऱ्या उमेदवाराला ५०,००० दरमाह वेतन दिला जाईल. या भरती संदर्भात अधिक माहिती अधिकृत अधिसूचनेमध्ये पुरवण्यात आली आहे. DIC मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कमीत कमी एका वर्षाचा कामाचा अनुभव असावा. जर तुमचे वय ३२ वर्षांपेक्षा कमी आहे, तसेच वरील सर्व अटींना पात्र आहात तर आजच dic.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करा. त्याआधी एकदा अधिसूचनेचा आढावा घ्या.