Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्यावरण क्षेत्र, शाश्वत भविष्याचे क्षेत्र! ‘या’ आहेत पर्यावरण क्षेत्रातील प्रमुख संधी

जगात सर्वात महत्वाचे असणारे पर्यावरण क्षेत्र खुप व्यापक आहे. त्यामुळे पर्यावरण क्षेत्रातील करिअर संधी विविध आणि व्यापक आहेत, यात पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन, आणि शाश्वतता या तिन्ही घटकांचा समावेश होतो. जाणून घेऊया क्षेत्रातील करिअरच्या संधी

  • By नारायण परब
Updated On: Jul 22, 2024 | 09:33 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

जगातील सर्वात महत्वाचे पण अनेक काळ दुर्लक्षित राहिलेले क्षेत्र म्हणजे पर्यावरण.  विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाची हानी केली आणि आज ज्यावेळी आपण अनेक वातावरणीय समस्यांचा सामना करत असून मानवाच्या अस्तित्वावर धोका निर्माण होऊ लागला आहे. त्यावेळी पर्यावरण क्षेत्राचे आपल्याला महत्व कळू लागले आहे. पर्यावरण क्षेत्र खुप व्यापक आहे. त्यामुळे पर्यावरण क्षेत्रातील करिअर संधी विविध आणि व्यापक आहेत, यात पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन, आणि शाश्वतता या तिन्ही घटकांचा समावेश होतो. या क्षेत्रातील प्रमुख करिअर पर्यायांमध्ये पर्यावरण शास्त्रज्ञ, पर्यावरण अभियंता, वनस्पतिशास्त्रज्ञ, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, शाश्वतता सल्लागार, पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती, अपशिष्ट व्यवस्थापन, आणि जल संसाधन व्यवस्थापक यांचा समावेश आहे.

पर्यावरण क्षेत्रातील करिअरच्या संधी-

  • पर्यावरण शास्त्रज्ञ-  पर्यावरणीय समस्यांचे संशोधन करून त्यांच्या उपाययोजना सुचवतात. ते जल, माती, आणि हवेचे नमुने गोळा करून विश्लेषण करतात.
  • पर्यावरण अभियंते- पर्यावरणीय समस्यांसाठी तांत्रिक समाधान तयार करतात, जसे की जलशुद्धीकरण, कचरा व्यवस्थापन, आणि प्रदूषण नियंत्रण.
  • वनस्पतिशास्त्रज्ञ- वनस्पतींचे अध्ययन करून त्यांचे संवर्धन करतात, तर वन्यजीव जीवशास्त्रज्ञ वन्यजीवांचे संरक्षण आणि त्यांच्या अधिवासाचे व्यवस्थापन करतात.
  • शाश्वतता सल्लागार- कंपन्यांना शाश्वत विकास धोरणे तयार करण्यात मदत करतात. ऊर्जा बचत, पर्यावरणीय प्रभाव कमी करणे, आणि हरित उपक्रमांची अंमलबजावणी हे त्यांचे मुख्य कार्य आहे.
  • पर्यावरण शिक्षण आणि जनजागृतीत काम करणारे व्यक्ती- शाळा, महाविद्यालये, आणि समाजात पर्यावरणाबद्दल जनजागृती करतात. अपशिष्ट व्यवस्थापक कचरा संकलन, पुनर्वापर, आणि संधारण कार्यक्रमांची योजना आणि अंमलबजावणी करतात.
  • जल संसाधन व्यवस्थापक- जल संसाधनांचे व्यवस्थापन, जल प्रदूषण नियंत्रण, आणि जल संरक्षण कार्यक्रम राबवतात.

पर्यावरण क्षेत्रात करिअरसाठी आवश्यक असलेले शिक्षण 

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध शैक्षणिक पार्श्वभूमी आवश्यक आहेत. बॅचलर पदवी (B.Sc.) हे सुरुवातीचे पाऊल आहे, जे पर्यावरण शास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, किंवा संबंधित क्षेत्रात असू शकते. मास्टर्स (M.Sc.) आणि डॉक्टरेट (Ph.D.) पदवी उच्चस्तरीय संशोधन आणि तांत्रिक ज्ञानासाठी आवश्यक आहेत.

इतर शैक्षणिक पात्रता

व्यावसायिक प्रमाणपत्रे आणि प्रशिक्षण पर्यावरण व्यवस्थापन, GIS, जल गुणवत्ता परीक्षण, आणि इतर विशेष कौशल्यांमध्ये मिळवता येतात. अशा शैक्षणिक आणि व्यावसायिक तयारीमुळे पर्यावरण क्षेत्रात एक स्थिर आणि समाधानकारक करिअर करता येते.

Web Title: Environment sector is sustainable future sector these are career opportunity in environment sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2024 | 08:13 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.