फोटो सौजन्य - Social Media
पुण्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. महत्वाची बाब म्हणजे ही अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी शेवटची संधी आहे. यानंतर विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही. अर्जासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी वेळीच पाऊल उचलावे, अन्यथा वेळ निघून गेल्यावर इच्छुक विद्यार्थ्यांच्या हातून संधी निसटून जाण्याची शक्यता आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ही महत्वाची बातमी आहे. तसेच या बातमीकडे समस्त विद्यार्थी वर्गांचे लक्ष लागून आहे. अकरावीच्या प्रवाहसील लवकरच स्वल्पविराम लागणार आहे.
हे देखील वाचा : फक्त तीन महिन्यात शिका परदेशी भाषा; मिळेल उत्तम संधी, कमवाल मोठ्या रकमेत
दहावी यशवीरित्या उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अकरावीची लगबग सुरु झाली आहे. एहेहेकंदरीत, बहुतेक विद्यार्थ्यांनी यासाठी अर्ज करण्याची सुरुवात केली आहे. तर अनेकांनी आपले अर्ज दाखल केले आहे. मुळात, या प्रवेशापासून काही कारणामुळे वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आपली प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. मुळात, विद्यार्थ्यांना अकरावीचा प्रवेश घडवण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. यासाठी ‘दैंनदिन गुणवत्ता फेरी’चे आयोजन करण्यात आले असून ही फेरी येत्या शनिवारपर्यंत ( September 5, 2024) राबविण्यात येणार आहे.
हे देखील वाचा : MBBS इच्छुकांसाठी खुषखबर, राज्यात 8 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वी इयत्तेसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात लागू आहे. त्यामुळे, सर्व प्रवेश ऑनलाइन केले जातात.