फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्ही रोजगाराच्या शोधामध्ये आहात, तर आता काळजी करण्याचे मुळीच कारण नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप काही करण्याची इच्छा आहे आणि उंच आकाशात झेप घेण्याची प्रखर इच्छा आहे. तर असे काही करणे जे अद्याप आणखीन कुणी केले नाही आहे किंवा फार कमी लोकं करतात, फार फायद्याचे ठरेल. फायद्याच्या गोष्टी जितक्या लाभदायक असतात तितकेच ते करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. करिअरच्या या सुवर्ण टिप्ससाठी पण युवकांना काही कष्ट घ्यावे लागणार आहेत.
हे देखील वाचा : आपण कशा ऑफिसमध्ये काम करत आहात? टॉक्सिक कि चांगले? जाणून घ्या
परंतु, हे घेतलेले कष्ट भविष्यमध्ये फार महत्वाचे ठरणार आहे. तज्ज्ञांच्या मते, केवळ 3 महिन्यांत एखादी नवीन भाषा शिकून तुम्ही दरमहा 50 हजार रुपयांपासून सुरू होणाऱ्या नोकऱ्यांचे दरवाजे सहज उघडू शकता. विशेष गोष्ट अशी आहे कि पुढे तुम्हाला लाखोंचा पगारही मिळू शकतो. आजच्या काळामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या अशा उमेदवारांच्या शोधामध्ये आहेत, ज्यांना अनेक भाषा येत असतात. जगामध्ये इंग्रजीनंतर, फ्रेंच, जपानी, जर्मन तसेच स्पॅनिशसारख्या भाषांना फार महत्व आहे. या भाषा शिकून तरुणांना भविष्यामध्ये अनेक संध्या प्राप्त करता येणार आहे. या भाषांना ज्ञात असणारे तरुण भविष्यत विदेशामध्ये काम करण्याची संधी मिळवू शकतात.
पाहायला गेले तर एखादी नवीन भाषा शिकणे फार कठीण नसते. तसे ते फार सोपेही नसते. नवीन भाषा शिकण्यासाठी मनामध्ये इच्छाशक्ती असणे फार महत्वाचे असते. दररोज नियमित अभ्यास करणे. भाषेचा सर्व करणे. त्या भाषेतील निदान १५ ते २० शब्दे दररोज अभ्यासणे आणि त्याचा बोलण्यात वापर करून आपल्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ करणे.
हे देखील वाचा : IBPS लिपिक प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला, ‘या’ लिंकवर थेट पाहा तुमचा रिझल्ट
एकंदरीत, बोलणे जितके महत्वाचे असते, तितकेच ऐकणे आणि वाचणे महत्वाचे असते. ज्या भाषेला शिकण्याची आपल्याला इच्छा आहे त्या भाषेसंबंधित पुस्तके वाचा. त्या भाषेतील पुस्तके वाचा. तुमच्या पसंतीचे कॉन्टेन्ट त्या भाषेमध्ये पहा. या नवीन भाषा शिक्षणाच्या समुद्रात स्वतःला झोकून घ्या. तरच नवीन भाषा आपण लवकर शिकू शकतो. निदान तीन महिन्यांच्या परिश्रमाने आपण त्या भाषेबद्दलचा पाया तयार करतो. परदेशी भाषा शिकल्याने तुम्हाला करिअरचे अनेक पर्याय मिळतात. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करणाऱ्या लोकांची मागणी वाढली आहे. काही ठिकाणी थेट संभाषणात दोन भाषांमधील संवाद सुलभ करण्यासाठी ट्रान्स्लेटरचा वापर केला जातो.