Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Financial News: गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्की वाचा! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ सरकारी योजनेत मिळतोय भरघोस परतावा…

Financial News: बँक एफडीपेक्षा सुरक्षित आणि अधिक फायदेशीर पर्याय शोधत आहात? पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिट स्किममध्ये १ लाख रुपयांवर मिळवा घसघशीत रिटर्न; जाणून घ्या गुंतवणुकीचे संपूर्ण गणित... पाहा सविस्तर बातमी!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 11, 2026 | 03:11 PM
Financial News: गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्की वाचा! पोस्ट ऑफिसच्या 'या' सरकारी योजनेत मिळतोय भरघोस परतावा...

Financial News: गुंतवणूक करण्यापूर्वी हे नक्की वाचा! पोस्ट ऑफिसच्या 'या' सरकारी योजनेत मिळतोय भरघोस परतावा...

Follow Us
Follow Us:
  • पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉझिटवर ६.९% ते ७.५% व्याज
  • १ ते ५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते; व्याजदर आधीच ठरलेले
  • ५ वर्षांच्या मुदतीवर कलम ८०C अंतर्गत कर सवलत 
Financial News: पैसे गुंतवायचे असतील, पण रिटर्न हे सुरक्षित असावं असं वाटत असेल, तर लोक प्रामुख्याने एफडीमध्ये (FD) पैसे गुंतवतात. पण एफडी व्यतिरिक्तही असा उत्तम ऑप्शन उपलब्ध आहे, जिथे पैसे जमा केल्यावर मोठ्या व्याजासह पूर्ण सुरक्षाही मिळते. आज आपण पोस्ट ऑफिसच्या ‘टाइम डिपॉझिट स्किम’विषयी (Post Office Time Deposit Scheme) सविस्तर जाणून घेणार आहोत, ज्याला पोस्ट ऑफिसची एफडी सुद्धा म्हटले जाते. या स्किममध्ये तुम्ही एकरकमी रक्कम गुंतवणूक करून १, २, ३ किंवा ५ वर्षांपर्यंत रक्कम फिक्स करू शकता आणि या योजनेतील व्याजदर हे आधीच ठरलेले असतात.

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या तिमाहीसाठी यावर ६.९ टक्के ते ७.५ टक्केपर्यंत व्याज दिले जात आहे. पण यात बँक एफडीपेक्षा जास्त फायदा आहे का? १ लाख रुपये जमा केल्यावर किती व्याज मिळेल? कोणत्या कालावधीत किती रिटर्न मिळेल आणि गुंतवणुकीपूर्वी कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे लागेल? याविषयीची सविस्तर माहिती पाहूया.

हेही वाचा: राज्यात १५ हजार शिक्षकांची मेगा भरती होणार; परिचारिका पदांचीही भरती; सुनेत्रा पवार यांची माहिती

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्किम म्हणजे काय?

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट ही एक सरकारी स्मॉल सेव्हिंग स्किम आहे. यामध्ये तुम्ही एकरकमी रक्कम जमा करता आणि निवडलेल्या कालावधीच्या शेवटी तुम्हाला तुमची मुद्दल परत मिळते. एक, दोन, तीन आणि पाच वर्षे पैसे गुंतवण्याचे ऑप्शन यात उपलब्ध आहेत. किमान एक हजार रुपयांनी यात अकाउंट ओपन करता येते, त्यानंतरची गुंतवणूक १०० रुपयांच्या पटीत करता येते, तर गुंतवणुकीसाठी मॅक्सिमम लिमिट नाही.

या स्किमचे व्याजदर अकाउंट ओपन करतानाच ठरवले जातात आणि निवडलेल्या कालावधीसाठी तेच दर लागू राहतात. व्याजाचं कॅलक्युलेशन दर तीन महिन्यांनी होतं, पण पैसे मात्र वार्षिक दिले जातात. लक्षात ठेवा की, व्याजाची रक्कम अकाउंटमध्ये तशीच राहिल्यास त्यावर अतिरिक्त व्याज मिळत नाही.

१ लाख रुपये जमा केल्यावर किती व्याज मिळेल?

ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ च्या तिमाहीनुसार पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटचे व्याजदर खालीलप्रमाणे आहेत:

  • १ वर्ष कालावधी: वार्षिक व्याजदर ६.९%, एका लाखावर मिळणारे वार्षिक व्याज ७,०८१ रुपये.
  • २ वर्षे कालावधी: वार्षिक व्याजदर ७.0%, एका लाखावर मिळणारे वार्षिक व्याज ७,१८६ रुपये.
  • ३ वर्षे कालावधी: वार्षिक व्याजदर ७.१%, एका लाखावर मिळणारे वार्षिक व्याज ७,२९१ रुपये.
  • ५ वर्षे कालावधी: वार्षिक व्याजदर ७.५%, एका लाखावर मिळणारे वार्षिक व्याज ७,७१४ रुपये.

हे व्याज दरवर्षी मिळू शकते. जसे की, ५ वर्षांच्या कालावधीत १ लाख रुपये जमा केल्यावर जवळपास ७,७१४ रुपयांचं वार्षिक व्याज मिळेल. ५ वर्षांत एकूण व्याज ३८,५७० रुपये होईल आणि टाइम पीरियड पूर्ण झाल्यावर १ लाख रुपयांची मुद्दल रक्कम परत मिळेप. म्हणजेच एकूण रक्कम १,३८,५७० रुपये होईल. हा एक अंदाज असून अकाउंट ओपन करण्याची तारीख आणि व्याजाच्या गणनेनुसार प्रत्यक्ष मिळणाऱ्या रकमेत किंचित फरक असू शकतो.

हेही वाचा: Engineering Jobs in AI Era: साधे कोडर नाही तर आता ‘या’ विशेष इंजिनिअर्सना आहे प्रचंड मागणी; मिळतोय करोडोंचा पगार

टॅक्समध्ये किती सूट मिळते?

गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेचा कालावधी, पैसे काढण्याचे नियम, टॅक्स लाभ आणि लागू व्याजदर अवश्य तपासून घ्यावेत. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमध्ये टॅक्सचा फायदा फक्त पाच वर्षांच्या कालावधीच्या अकाउंटवरच मिळतो. यात जमा केलेल्या रकमेवर आयकर अधिनियमाच्या कलम ८०C अंतर्गत सूटचा दावा केला जाऊ शकतो. मात्र, हा लाभ फक्त जुनी टॅक्स व्यवस्था निवडणाऱ्या करदात्यांनाच मिळतो. कलम ८०C अंतर्गत एकूण गुंतवणुकीवर जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याचा अर्थ असा होत नाही की या स्किममधील पूर्ण कमाई टॅक्स-फ्री आहे; अकाउंटवर मिळणारं व्याज हे तुमच्या उत्पन्नात जोडले जाते आणि लागू टॅक्स स्लॅबनुसार त्यावर टॅक्स द्यावा लागू शकतो.

अकाउंट कोण ओपन करू शकतं?

  • कोणतीही भारतीय व्यक्ती आपल्या नावावर हे अकाउंट ओपन करू शकते.
  • पालक अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने अकाउंट उघडू शकतात.
  • १० वर्षे किंवा त्याहून जास्त वयाचा अल्पवयीन व्यक्ती स्वतःच्या नावावर अकाउंट ओपन करू शकतो.
  • मानसिकरित्या अस्वस्थ व्यक्तीकडून रजिस्टर्ड पालक अकाउंट उघडू शकतात.
  • अनिवासी भारतीय (NRI) या स्किममध्ये नवीन अकाउंट ओपन करू शकत नाहीत.

महत्त्वाची टीप: गरज पडल्यास ६ महिने पूर्ण झाल्यानंतर वेळेपूर्वी अकाउंट बंद केलं जाऊ शकतं. पण असं केल्यास व्याज कमी मिळते. ६ महिने ते १ वर्षाच्या आत अकाउंट बंद केल्यास पोस्ट ऑफिस बचत अकाउंटचे व्याजदर लागू होतात. दीर्घ कालावधीचे अकाउंट बंद केल्यास ठरलेल्या कपातीचे नियम लागू होतात. त्यामुळे फक्त जास्त व्याज पाहून ५ वर्षांसाठी सर्व पैसे जमा करू नका. भविष्यात किंवा इमर्जन्सीमध्ये पैशांची गरज भासू शकते, हे लक्षात घेऊन सर्व बचत एकाच कालावधीत गुंतवणे टाळावे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्किममध्ये किमान किती गुंतवणूक करता येते?

    Ans: या स्किममध्ये किमान १,००० रुपयांपासून अकाउंट उघडता येते आणि त्यानंतर १०० रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते.

  • Que: ५ वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर सध्या किती व्याज मिळत आहे?

    Ans: ऑक्टोबर-डिसेंबर २०२६ तिमाहीसाठी ५ वर्षांच्या कालावधीवर ७.५ टक्के वार्षिक व्याज दिले जात आहे.

  • Que: या योजनेत कर सवलत (Tax Benefit) कोणाला मिळते?

    Ans: या स्किममध्ये केवळ ५ वर्षांच्या कालावधीच्या अकाउंटवर जुन्या कर प्रणालीनुसार कलम ८०C अंतर्गत टॅक्स सूटचा लाभ घेता येतो.

Web Title: Financial news post office time deposit scheme returns sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • FD
  • post office
  • Savings
  • tax

संबंधित बातम्या

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न
1

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न
2

SBI Diwali Special FD : दिवाळीच्या मुहूर्तावर SBI कडून मोठं गिफ्ट! स्पेशल FD योजनेत पैसे गुंतवा, मिळणार जबरदस्त रिटर्न

Low Income Savings Scheme : कमी कमाई करणारेही बनू शकतात लखपती! दररोज 100 रुपयांची बचत; असा उभा राहा 15 लाखांपेक्षा जास्त फंड
3

Low Income Savings Scheme : कमी कमाई करणारेही बनू शकतात लखपती! दररोज 100 रुपयांची बचत; असा उभा राहा 15 लाखांपेक्षा जास्त फंड

Post Office Pension Plan : निवृत्तीनंतर पैशांची चिंता मिटवा! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दरमहा मिळवा ५,५५० रुपयांचे निश्चित उत्पन्न
4

Post Office Pension Plan : निवृत्तीनंतर पैशांची चिंता मिटवा! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दरमहा मिळवा ५,५५० रुपयांचे निश्चित उत्पन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.