Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CET परीक्षेबाबत परीक्षा केंद्रांची माहिती जाहीर; अंतिम प्रवेशपत्रात ‘या’ माहितीला करण्यात आले प्रसिद्ध

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मार्फत २४ मार्च ते १६ मे २०२६ दरम्यान विविध अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होणार आहेत. अस्थायी प्रवेशपत्रातून परीक्षा शहर व जिल्ह्याची माहिती ८-१० दिवस आधी मिळणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 20, 2026 | 03:09 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदवीपूर्व आणि पदव्युत्तर १७ व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा २४ मार्च २०२६ ते १६ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. यंदाच्या प्रक्रियेत प्रथमच मोठा बदल करण्यात आला असून विद्यार्थ्यांना दोन प्रकारची प्रवेशपत्रे देण्यात येणार आहेत.

आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा 23 मार्चपासून; 43000 विद्यार्थी देणार परीक्षा, 175 केंद्रांची निवड

सीईटी कक्षाकडून यंदा विद्यार्थ्यांना एक अस्थायी (Provisional) आणि एक अंतिम (Final) असे दोन प्रवेशपत्र दिले जाणार आहेत. हा निर्णय विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाबत आधीच स्पष्ट माहिती मिळावी आणि नियोजन सोपे व्हावे या उद्देशाने घेण्यात आला आहे. सीईटी कक्षाने अंतिम परीक्षांचे वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले असून त्यानुसार पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रवेश परीक्षेच्या ८ ते १० दिवस आधी विद्यार्थ्यांच्या लॉग-इनमध्ये अस्थायी प्रवेशपत्र उपलब्ध होईल. या प्रवेशपत्रामध्ये विद्यार्थ्याला त्याचे परीक्षा केंद्र कोणत्या जिल्ह्यात आणि शहरात आहे याची माहिती मिळणार आहे. परीक्षा केंद्र निवडताना विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार चार जिल्ह्यांची निवड करावी लागते. त्यानुसार अस्थायी प्रवेशपत्रात संबंधित जिल्हा व शहराची माहिती देण्यात येईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास आणि राहण्याचे नियोजन करण्यास मदत होईल.

यानंतर, प्रवेश परीक्षेच्या ३ ते ४ दिवस आधी अंतिम प्रवेशपत्र विद्यार्थ्यांच्या लॉग-इनमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. या अंतिम प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष परीक्षा केंद्राची सविस्तर माहिती दिली जाईल. यामध्ये परीक्षा केंद्राचा कोड, केंद्राचे नाव, पूर्ण पत्ता आणि आवश्यक सूचना यांचा समावेश असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम प्रवेशपत्र काळजीपूर्वक डाउनलोड करून त्यातील सर्व तपशील तपासणे आवश्यक आहे. सीईटी कक्षाने सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी त्यांच्या परीक्षा केंद्राशी संबंधित जिल्हा, तालुका आणि इतर तपशीलांची अचूक पडताळणी करावी. कोणतीही चूक आढळल्यास तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, जेणेकरून परीक्षेच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही.

CET परीक्षेबाबत महत्वाची बातमी! विद्यार्थ्यांना प्रथमच मिळणार….; कधी होणार परीक्षा?

दरम्यान, काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी अस्थायी प्रवेशपत्रे आधीच उपलब्ध करण्यात आली आहेत. एमपीएड (MP.Ed) अभ्यासक्रमाची परीक्षा २४ मार्च २०२६ पासून सुरू होत असून यासाठी २,५२५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तसेच एमएड (M.Ed) अभ्यासक्रमाची परीक्षा २५ मार्च २०२६ पासून सुरू होणार असून यासाठी ३,९८५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. याशिवाय एमएचएमसीटी (MHMCT) अभ्यासक्रमाची परीक्षा देखील २५ मार्चपासून सुरू होत असून यासाठी ५५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूणच, यंदाच्या सीईटी प्रक्रियेत करण्यात आलेला हा बदल विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. दोन टप्प्यांमध्ये प्रवेशपत्र देण्याच्या निर्णयामुळे परीक्षा केंद्राबाबतची अनिश्चितता कमी होईल आणि विद्यार्थ्यांना वेळेआधी नियोजन करता येईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेशपत्र डाउनलोड करून परीक्षा तयारीसोबतच प्रवासाचे नियोजनही योग्य पद्धतीने करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: For the first time two cet admit cards exam center details to be included in the final admit card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • CET Exam

संबंधित बातम्या

MSCE ने केंद्र प्रमुख परीक्षा २०२५ चा निकाल केला जाहीर; महाटीईटी/सीटीईटी माहिती भरण्याची मुदत वाढवण्यात आली
1

MSCE ने केंद्र प्रमुख परीक्षा २०२५ चा निकाल केला जाहीर; महाटीईटी/सीटीईटी माहिती भरण्याची मुदत वाढवण्यात आली

CET परीक्षेबाबत महत्वाची बातमी! विद्यार्थ्यांना प्रथमच मिळणार….; कधी होणार परीक्षा?
2

CET परीक्षेबाबत महत्वाची बातमी! विद्यार्थ्यांना प्रथमच मिळणार….; कधी होणार परीक्षा?

पीसीएम, पीसीबीच्या नोंदणीस मुदतवाढ! PCM समूहाच्या नोंदणीमध्ये गतवर्षापेक्षा वाढ
3

पीसीएम, पीसीबीच्या नोंदणीस मुदतवाढ! PCM समूहाच्या नोंदणीमध्ये गतवर्षापेक्षा वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.