फोटो सौजन्य - Social Media
देशभरात भरतीच्या विविध प्रक्रिया नियमित सुरु असतात. या भरतीच्या प्रक्रियांमध्ये उमेदवार मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना काही पात्रता मानदंड तसेच अटी शर्तीना पात्र करावे लागते. या पात्रता मानदंडांना पात्र उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येते. परंतु, कधी कधी हे पात्रता मानदंड न पटण्यासारखे असतात. कधी कधी तर स्वतः कंपनी या मानदंडांना हटवण्याचे आदेश देते. अशीच काही घटना फॉक्सकॉन या कंपनीसोबत घडली आहे. फॉक्सकॉन Apple च्या प्रोडक्ट्सचा पुरवठा करतो. या कंपनीने नुकतेच जाहीर झालेल्या भरतीच्या जाहिरातीवर रोक लावली आहे. तसेच ही जाहिरात थांबवण्यात आली असून, भरती विषयक नवीन जाहिरात लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
फॉक्सकॉनने कंपनीसाठी आदेश जाहीर केले आहेत कि भरती विषयक असलेल्या जाहिरातीमध्ये वय, लिंग आणि वैवाहिक स्थिती यांचा मानदंडमध्ये समावेश करू नका. २५ जून २०२४ रोजी, फॉक्सकॉनकडून भरती विषयक जाहिरात जाहीर करण्यात आली होती. यामध्ये असे नमूद होते कि विवाहित महिलांना या भरतीमध्ये अर्ज करता येणार नाही. विवाहित महिलांची या भरतीच्या माध्यमातून नियुक्ती करण्यात येणार नाही. मुख्य म्हणजे हे एक प्रकारचे भेदभाव असल्याचे सांगण्यात आले, यावर कंपनीने पाऊल उचलले आहे.
आता फॉक्सकॉनने आपल्या रिक्रूटमेंट एजंटना नोकरीच्या जाहिराती आणि कंपनीमधून वय, लिंग आणि विवाहित स्थिती यासारखे निकष काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या जाहिरातींमध्ये कंपनीचे नाव वापरण्यास सक्त मनाई केली आहे. मुळात, फॉक्सकॉन कंपनीतील भरतीच्या प्रक्रियेसाठी थर्ड पार्टी कंपनीवर अवलंबून आहे. या कंपन्या फॉक्सकॉनमधील भरतीच्या प्रक्रियेत मदत करतात. उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे, तसेच त्यांची नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या मुलाखती आणि जाहीर क्लरण्यात आलेल्या जाहिराती यामध्ये या कंपन्यांचा मोलाचा वाटा असतो.
त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या कौटुंबिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमुळे चक्क विवाहित महिलांना नियुक्ती देणे नाकारली होती. अनेक लोकांनी यावर नाराजी जाहीर केली होती. या बाबी लक्षात येताच, फॉक्सकॉनने या बाबत तातडीने बदल करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीच्या HR अधिकाऱ्यांशी चर्चा करत संपूर्ण भरतीच्या प्रक्रियेत बदल करण्याचे आदेश कंपनीने जाहीर केले आहे. तर फॉक्सकॉनने अद्याप विवाहित महिलांच्या बाबतीत काही भाष्य केले नाही आहे तसेच Apple कडूनही अद्याप यावर काही भाष्य आले नाही आहे.