फोटो सौजन्य - सोशल मिडिया
देशभरातील अनेक तरुण दरवर्षी मोठ्या संख्येने कामाच्या निमित्ताने पाश्चिमात्य देशांची वाट धरत असतात. मुळात या देशांमध्ये साधारणपणे अमेरिका, कॅनडा तसेच काही युरोपीय देशांचा समावेश असतो. भारतातील बहुतेक विद्यार्थी या देशांमध्ये आपले शिक्षणही पूर्ण करण्यास जात असतात. तर काही भारतीय विद्यार्थी, भारतात आपले शिक्षण पूर्ण करून अमेरिकासारख्या प्रगत देशामध्ये करिअर घडवण्यास जात असतात. देशातून अमेरिकेसारख्या देशामध्ये कामानिमित्त जाणाऱ्या संख्येतील बहुतेक लोकांनी IIT किंवा MBA चे शिक्षण केलेले असते. बहुतेक भारतीयांचा हा गैरसमज आहे कि अमेरिकेमध्ये याच क्षेत्रातील भारतीय उमेदवारांना नोकरीच्या संध्या मिळतात. जर तुम्हालाही असा गैरसमज आहे तर तुम्ही फार चुकीचे विचार करत आहात. अमेरिका जरी तंत्रज्ञानामध्ये तसेच आर्थिकदृष्टया अग्रेसर असली तरी तेथील नागरिक इतर क्षेत्रात कामे करूनही कोट्यवधींची संपत्ती कमवत आहेत.
जर तुम्ही तंत्रज्ञान किंवा व्यवसाय क्षेत्रातील शिक्षण घेतले नाही आहे तरी तुम्हाला परदेशामध्ये जाऊन, विशेषतः अमेरिकेमध्ये जाऊन आपले करिअर घडवायचे आहे. तसेच कोट्यवधी कमवायचे आहे. तर अमेरिकेमध्ये असे अनेक क्षेत्र आहेत, ज्यामध्ये कामे करून आपण आपल्या स्वप्नांना उजाळा देऊ शकता.
नर्स प्रॅक्टिशनरचे काम मुख्यतः रुग्णांची सेवा करणे तसेच त्यांची काळजी घेणे असते. हे वैद्यकीय क्षेत्रातील काम असून भारतामध्येही अनेक रुग्णालयामध्ये नर्स प्रॅक्टिशनरची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. देशभरातुन अनेक मुली या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतात. आणि नर्सिंग मध्ये बॅचलर डिग्री मिळवून पदवीधर होतात. जर तुम्ही या क्षेत्रातील आहात तर अमेरिकेमध्ये कामाचे संशोधन करण्यास आजच सुरुवात करा. या कामातून भारतीय मुद्रेत जवळजवळ लाखोंच्या घरामध्ये वेतन मिळेल.
संध्यावं सोशल मीडियाचे वातावरण आहे. जगामध्ये सर्वीकडे सगळ्या पिढीतील माणसे सोशल मीडियाच्या अधीन गेले आहेत. याचा फायदा घेत मोठमोठ्या कंपन्या सोशल मीडियावर जाहिराती प्रकाशित करत लोकांना आकर्षित करत आहेत. या कामामध्ये त्या कंपन्यांना सोशल मीडिया प्लॅनरची गरज भासत आहे, जो आपल्या कौशल्याने कंपन्यांचे सर्व सोशल मीडिया हॅन्डल सांभाळेल आणि त्यांना या क्षेत्रात पुढे नेण्याची जबाबदारी पार पाडेल.
जर तुमच्याकडे एव्हिएशनची पदवी आहे तर तुम्ही निश्चितच कोटींचे धनी होण्याच्या मार्गी आहात. अमेरिकेची एअरलायन्स जगातील सगळ्यात मोठ्या एअरलायन्सपैकी एक आहे. जर तुम्ही येथे अर्ज करून नियुक्त झालात तर निश्चितच तुमचे वार्षिक वेतन कोटींच्या घरामध्ये असणार आहे.