Pic credit : social media
मुंबई: शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रूजवण्यासाठी राज्य सरकारने आयोजित केलेल्या महावाचन उत्सवाला पहिल्याच आठवड्यात उदंड प्रतिसाद लाभला आहे. या उत्सवासाठी सर्व जिल्ह्यांमधून आतापर्यंत नऊ लाख विद्यार्थ्यांनी नोंद केली आहे. यंदा गणेशोत्सवातील सुट्यांचा विचार करून नोंदणीसाठी 20 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली असल्याने ही संख्या एक कोटींपर्यंत घेऊन जाण्याचा मानस असल्याचे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी सांगितले.
सध्याचे विद्यार्थी माेबाईलमध्ये पूर्णपणे अडकून असल्याने वाचनाकडे त्यांचा कल अजिबात नसल्याचे वारंवारं समाेर येत आहे. स्मार्टफोनच्या प्रभावामुळे आणि खासकरून कोविड काळात विद्यार्थ्यांच्या हाती स्मार्टफोन आल्याने वाचनाकडे विद्यार्थ्यांनी चक्क पाठ फिरवली आहे. वाचनामुळे विचारांच्या कक्षा रूंदावतात. त्यामुळे वाचनसंस्कृती रूजणे आणि फोफावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी गेल्या वर्षीपासून राज्य सरकारने महावाचन उत्सव सुरू केला, असल्याची माहिती आर. विमला यांनी दिली. गेल्या वर्षी या उपक्रमात 53 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या उपक्रमाबाबत टीआयएसएसने सर्वेक्षण करून त्याचा अहवालही प्रसिद्ध केल्याचे आर. विमला यांनी सांगितले.
हे देखील वाचा : ‘मुख्यमंत्री योजनादूत’ अंतर्गत तब्बल ५० हजार उमेदवारांची भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रिया
माेिहमेला मुदतवाढ; यंदा एक काेटी विद्यार्थ्यांचे लक्ष्य गाठण्याचे ध्येय
यंदा या मोहिमेची सुरुवात 1 सप्टेंबरपासून झाली असून 15 सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची मुदत होती, पण गणेशोत्सवाच्या सुट्या लक्षात घेत ही मुदत आणखी वाढवण्यात आल्याचे आर. विमला यांनी सांगितले. आतापर्यंत 36 जिल्ह्यांमधील 95 हजार 144 शाळांमधील नऊ लाख 20 हजार 516 विद्यार्थ्यांनी या उत्सवात सहभाग नोंदवला आहे. ही नोंदणी मोहीम सुरू राहणार असून आम्ही अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यासाठी उपाययोजना करत आहोत. यंदा एक कोटी विद्यार्थ्यांचे लक्ष्य गाठण्याचे ध्येय आहे, असेही त्या म्हणाल्या.
हे देखील वाचा : नॅशनल हँडलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे विविध पदांसाठी भरती; 2 लाखांपेक्षा अधिक मिळेल पगार
सर्वाेत्तम सारांश लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांचा गाैरव
या मोहिमेत विद्यार्थ्यांनी त्यांना आवडणारे कोणतेही एक पुस्तक वाचून त्याचा सारांश लिहायचा आहे. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी 50 ते 60 शब्दांत, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी 80 ते 100 शब्दांत आणि आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी 100 ते 150 शब्दांत हा सारांश लिहिणे अपेक्षित आहे. हा उत्सव शालेय, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर पार पडणार असून प्रत्येक स्तरावर तीन सर्वोत्तम सारांश लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव पुस्तकरूपी भेट देऊन करण्यात येणार आहे, असेही आर. विमला यांनी सांगितले.
Pic credit : social media
उपक्रमाचा उद्दिष्टये :
– वाचन संस्कृतीला प्राेत्साहन देणे
-विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गाेडी निर्माण करणे
-मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीची विद्यार्थ्यांची नाळ जाेडणे
-र्दर्जेदार साहित्यांचा व लेखक यांचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देणे
-विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाला चालना देणे
-विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला भाषा संवाद काैशल्य विकासास चालना देणे
ब्रॅंड ॲम्बेसेडर अिमताभ बच्चन व आशा भाेसले
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वर्ष 2024-25 या वर्षात महावाचान उत्सव-2024 हा उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमासाठी ज्येष्ठ अिभनेता अिमताभ बच्चन व ज्येष्ठ गाियका आशा भाेसले यांची ब्रॅंड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.