फोटो सौजन्य - Social Media
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेन्टिस पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना आधीच जाहीर करण्यात आली होती. २४ जानेवारीला अधिसूचना जाहीर झाली असून उमेदवारांना अर्ज करण्यास विंडो ओपन करण्यात आली होती. अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरतीच्या प्रक्रियेबद्दल:
अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IOCL च्या iocl.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. IOCL NR या पदासाठी अर्ज १३ फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे. तर IOCL ER या पदासाठी अर्ज १४ फेब्रुवारीपर्यंत करता येणार आहे. या भरतीबाबत महत्वाची बाब म्हणजे अर्ज निशुल्क करता येणार आहे. या भरतीसाठी सर्व उमेदवार अगदी मोफत अर्ज करू शकता. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरा.
उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी काही पात्रता निकष पात्र करावी लागणार आहेत. हे अटी शर्ती उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत, तसेच उमेदवारांना काही शैक्षणिक अटी शर्तीना पात्र करावे लागणार आहेत. या भरतीसाठी किमान वय १८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त २४ वर्षे वय असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. Apprentice NR च्या पदांसाठी एकूण रिक्त जागा ४५६ आहे. तर Apprentice ERच्या पदासाठी एकूण ३८२ जागा रिक्त आहेत. टेक्निशिअन क्षेत्रात किंवा संबंधित क्षेत्रात पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
निवड प्रक्रियेत तीन टप्प्यांचा समावेश आहे. उमेदवारांना मेरिट लिस्टच्या माध्यमातून शॉर्टलिस्ट केले जाईल. तसेच दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच वैद्यकीय चाचणीला पात्र करत उमेदवारांना या भरतीसाठी नियुक्त होणार आहे. या भरतीसंबंधित अधिक माहिती अधिसूचनहेमध्ये देण्यात आली आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. या भरतीमध्ये नियुक्तीसाठी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अद्याप या परीक्षासंदर्भात तारखा जाहीर करण्यात आल्या नाहीत. या संबंधित तारखा लवकर जाहीर करण्यात येतील. अधिक माहितीसाठी IOCL च्या iocl.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.