फोटो सौजन्य - Social Media
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)मध्ये काम करण्यासाठी अनेक उमेदवार फार इच्छुक असतात. मुळात, IIT इंदोरमध्ये या भरतीचे आयोजन करण्यात आले आहेत. एकूण १३ रिक्त जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. स्त्री तसेच पुरुष दोन्ही उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. Executive Engineer, Medical Officer, Junior Assistant, etc. या पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी iiti.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. मुळात, सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुलकाची रक्कम ५०० रुपये ठरवण्यात आली आहे. OBC, NCL आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहे. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत. तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त वयोमर्यादा ४५ निश्चित करण्यात आली आहे.
नियुक्तीच्या प्रक्रियेत ५ टप्प्यांचा समावेश आहे. यामध्ये उमेदवारांना लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. तसेच कौशल्यांची चाचणी उत्तीर्ण करावी लागणार आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. दस्तऐवजांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीला उर्तीर्ण करत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
अशा प्रकारे करता येईल IIT Indore Non-Teaching Recruitment 2025साठी अर्ज
विविध पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. सिव्हिल विभागातील Executive Engineer पदासाठी १ जागा रिक्त आहे. तसेच मेडिकल ऑफिसर, असिस्टंट रजिस्टर, सिनिअर इंजिनिअर आणि असिस्टंट सेक्युरिटी ऑफिसरच्या पदासाठी प्रत्येकी १ जागा रिक्त आहे. ज्युनिअर Superintendent पदासाठी २ तर ज्युनिअर असिस्टंट पदासाठी एकूण ५ जागा रिक्त आहेत. अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.