फोटो सौजन्य - Social Media
इंडियन पोस्ट असोसिएशन (IPA)साठी महत्वाची भरती आहे. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून ४१ रिक्त जागा भरण्याचे योजिले आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करून नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला ५०,००० रुपये ते १,६०,००० रुपयांदरम्यान वेतन मिळेल. नियुक्तीच्या प्रक्रियेत मुलाखतीसाठी तयार राहावे लागणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी IPA च्या ipa.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
३० जूनपासून या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर उमेदवारांना ३० जुलैपर्यंत या भरतीसाठी अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. पण तारीख निश्चित नाही. उमेदवारांना अर्ज करताना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराना ४०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर OBC तसेच EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ३०० रुपये रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तर SC / ST / Women प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
Executive पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास काही शैक्षणिक अटी शर्ती पात्र असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक अटी जाणून घेण्यासाठी जाहीर अधिसूचना वाचून काढावी. निश्चित वयोमर्यादेनुसार, जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. निवड प्रक्रियेत चार टप्प्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना लेखी परीक्षा पात्र करावी लागणार आहे. तसेच नंतर मुलाखतीचा टप्पा पात्र करावे लागेल.
दस्तऐवजांच्या पडताळणीसह वैद्यकीय चाचणी पात्र करत उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जाहीर करण्यात आलेलया अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा तसेच जुलै महिन्याच्या उत्तरार्धा आधी अर्ज प्रक्रियेस पूर्ण करण्यात यावे.