फोटो सौजन्य - Social Media
भारतातील आणि जागतिक स्तरावरील आघाडीची तांत्रिक कंपनी HCLTech ने तिच्या टेकबी (TechBee) अर्ली करिअर प्रोग्रामसाठी आवेदन आमंत्रित करण्याची घोषणा केली आहे. हा एक अनोखा प्रोग्राम आहे, जो बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर सुरू करण्याची संधी देतो. 2023, 2024 मध्ये बारावी पूर्ण केलेले आणि 2025 मध्ये बारावी पूर्ण करणारे विद्यार्थी या कार्यक्रमासाठी पात्र आहेत.
HCLTech च्या टेकबी प्रोग्राममध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 12 महिन्यांचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, त्यांना HCLTech मध्ये पूर्णवेळ नोकरी मिळते. या प्रोग्रामचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, विद्यार्थी BITS पिलानी, IIIT कोट्टायाम, SASTRA युनिव्हर्सिटी आणि ऍमिटी युनिव्हर्सिटी ऑनलाईन यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून पार्ट-टाइम उच्च शिक्षण घेऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी व्यावसायिक अनुभव आणि उच्च शिक्षण मिळण्याची संधी मिळते.
या प्रोग्रामसाठी मॅथेमॅटिक्स किंवा बिजनेस मॅथेमॅटिक्स विषय घेतलेले विद्यार्थी तांत्रिक भूमिकांसाठी पात्र आहेत. डिजिटल इंजिनिअरिंग, क्लाऊड, डेटा सायन्स आणि AI यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टेकबी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. या प्रोग्रामच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी HCLTech मध्ये यशस्वी करिअर घडवले आहे.
HCLTech चे वरिष्ठ उपाध्यक्ष सुब्रमण्यम बालासुब्रमण्यम म्हणतात, “2017 पासून, टेकबी प्रोग्राममुळे हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळाले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील नामांकित ब्रँड्ससाठी प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळाली आहे. तांत्रिक कौशल्ये आणि उद्योगाची प्रत्यक्षात जाण यामुळे त्यांचे करिअर घडण्यास मदत झाली आहे. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणादरम्यानच त्यांचे उच्च शिक्षणही सातत्याने सुरू राहते, ज्यामुळे त्यांना करिअर आणि शिक्षण यांचा उत्तम समतोल राखता येतो. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याची संधी देतो, तसेच त्यांना व्यवसायिक जगताची योग्य समज मिळवून देतो.”
युवा प्रतिभांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी HCLTech ने राष्ट्रीय कौशल्य विकास निगम (NSDC) आणि भारतातील विविध राज्य कौशल्य विकास संस्थांशी भागीदारी केली आहे. यामुळे कमी प्रतिनिधित्व असलेल्या पार्श्वभूमीतून आलेल्या विद्यार्थ्यांसाठीही हा कार्यक्रम सहज उपलब्ध होतो. सर्वसमावेशकता आणि संधी समानता या मूल्यांना प्राधान्य देत, HCLTech हा कार्यक्रम संपूर्ण भारतभर राबवत आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील या सुवर्णसंधीचा लाभ घेता येतो.
अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी भेट द्या: www.hcltechbee.com