फोटो सौजन्य - Social Media
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार होते. मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज नोंदवले. लवकरच, या भारतीसंदर्भात आयोजित नियुक्तीला सुरुवात करण्यात येणार आहे. उमेदवारांना परीक्षा पात्र करावे लागणार आहे. ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड असून अर्ज कर्त्या उमेदवारांना निवड होण्यासाठी या परीक्षाला उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे. तसेच एकूण ३९४८१ रिक्त पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात प्रवेश पात्र पाहता येणार आहे. तसेच त्यांचे Application Status चेक करता येणार आहे. ते पाहण्यासाठी उमेदवारांनी SSC च्या ssc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
नियुक्तीच्या प्रक्रियेत विविध टप्प्यांचा समावेश आहे. एकंदरीत, उमेदवारांना नियुक्त होण्यासाठी लेखी परीक्षा पात्र करावी लागणार आहे. परीक्षेचे आयोजन ४ फेब्रुवारी २०२५ ते २५ फेब्रुवारी २०२५ या तारखांदरम्यान करण्यात आले आहे. यानंतर उमेदवारांना Physical Efficiency Test साठी उपस्थित राहावे लागणार आहे. दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी उमेदवारांना बोलवण्यात येणार असून शेवटी वैद्यकीय चाचणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहावे लागणार आहे. अशा चार टप्य्यांमध्ये ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे.
अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे योजिले होते. उमेदवारांनी ५ सप्टेंबर २०२४ या तारखेपासून ते १४ ऑक्टोबर २०२४ तारखेदरम्यान या भरतीसाठी त्यांचे अर्ज नोंदवले होते. या भरतीसाठी अर्ज करण्यास काही महत्वाचे निकष निश्चित करण्यात आले होते. हे निकष शैक्षणिक तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात होते. किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. तर जास्तीत जास्त २३ वर्षे इतकी आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकता होते. तसेच या भरतीसाठी शैक्षणिक अट किमान दहावी उत्तीर्ण असणे असे निश्चित करण्यात आले होते.
मुळात, SSC ने या भरतीचे आयोजन जनरल ड्युटी कॉन्स्टेबल्सची रिक्त पदे भरण्यासाठी केली होती. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस (CAPF), BSF, CISF, CRPF, ITPB, NIA, SSB, Assam Rifles तसेच SSF या विभागांमध्ये काम करता येईल. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.