फोटो सौजन्य - Social Media
दरवर्षी लाखो विद्यार्थी बी.टेक. पूर्ण करून अभियांत्रिकी क्षेत्रात करिअरची सुरुवात करतात. मात्र स्पर्धा वाढत असल्याने कोणत्या क्षेत्रात जास्त संधी आणि आकर्षक पगार मिळतो हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. आज केवळ पूल किंवा मशिन्स तयार करणं म्हणजे इंजिनियरिंग नाही, तर डेटा, क्लाऊड कंप्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या नवनवीन तंत्रज्ञानातही अभियांत्रिकी तज्ज्ञांची मोठी मागणी आहे. भारतामध्ये टेक्नॉलॉजी क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. काही खास इंजिनिअरिंग रोल्स पारंपरिक शाखांपेक्षा जास्त पगार देतात. चला जाणून घेऊया सर्वाधिक पगाराच्या सात अभियांत्रिकी नोकऱ्यांविषयी:
सॉफ्टवेअर आर्किटेक्ट
मोठ्या टेक कंपन्यांमध्ये संपूर्ण सॉफ्टवेअर सिस्टमची रचना तयार करण्याची जबाबदारी सॉफ्टवेअर आर्किटेक्टवर असते. त्यांचे सरासरी वार्षिक वेतन ₹33 लाख ते ₹50 लाख असू शकते.
क्लाऊड आर्किटेक्ट (Cloud Architect)
क्लाऊड सेवा (AWS, Azure, Google Cloud) वाढल्याने यांची मागणी प्रचंड वाढली आहे. वार्षिक पगार साधारण ₹20 लाख ते ₹41 लाख मिळू शकतो.
AI/ML इंजिनियर
आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगवर आधारित तंत्रज्ञान तयार करणारे हे तज्ज्ञ भविष्यातील महत्त्वाचा आधार मानले जातात. वार्षिक कमाई ₹15 ते ₹30 लाख पर्यंत.
पेट्रोलियम इंजिनियर
तेल व वायू क्षेत्रात काम करणाऱ्या इंजिनियरांना कठीण कामासाठी उच्च वेतन दिले जाते. वार्षिक उत्पन्न ₹15 ते ₹25 लाखांपेक्षा जास्त असू शकते.
सायबर सिक्युरिटी इंजिनियर
डिजिटल युगात सायबर हल्ले वाढत असल्याने सिस्टिम व नेटवर्कचे रक्षण करणाऱ्यांची मागणी प्रचंड आहे. पगार ₹10 ते ₹25 लाख दरवर्षी.
डेटा इंजिनियर
मोठ्या प्रमाणात डेटा साठवून तो व्यवस्थित करण्याचे काम करणाऱ्या इंजिनियरांची बिझनेस जगतात गरज वाढली आहे. सरासरी पगार ₹12 ते ₹22 लाख.
ब्लॉकचेन इंजिनियर
क्रिप्टो, फायनान्स व हेल्थकेअर क्षेत्रात ब्लॉकचेनचे महत्त्व वाढले आहे. या नव्या तंत्रज्ञानाचे तज्ज्ञ वर्षाला ₹8 ते ₹30 लाख कमवू शकतात.
अभियांत्रिकीमध्ये फक्त आवड असणे पुरेसे नाही, तर योग्य क्षेत्र निवडून उच्च पगार आणि उज्ज्वल करिअर घडवणे महत्त्वाचे आहे.