Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HLL ची हिंदलॅब्स खारघर प्रयोगशाळा देशातील पहिली सीएपी मान्यता प्राप्त सार्वजनिक प्रयोगशाळा

नवी मुंबईतील हिंदलॅब्स खारघर प्रयोगशाळेला सीएपी मान्यता मिळाली असून ती भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील मान्यताप्राप्त प्रयोगशाळा ठरली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 13, 2025 | 05:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • एचएलएलने 134 हिंदलॅब्स स्थापन केल्या
  • प्रयोगशाळा 3,600 हून अधिक सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील रुग्णांना अचूक आणि विश्वासार्ह चाचणी अहवाल
  • ६ प्रयोगशाळांना आधीच NABL मान्यता

नवी मुंबईतील हिंदलॅब्स खारघर प्रयोगशाळेने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट (CAP) कडून मान्यता मिळवत ती सीएपी मान्यता प्राप्त भारतातील पहिली सार्वजनिक क्षेत्रातील प्रयोगशाळा ठरली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एचएलएल लाइफकेअर लिमिटेड (HLL) या सरकारी कंपनीने ही माहिती दिली. (Career)

Navi Mumbai : नवी मुंबईत होणार एज्युसिटी; आंतरराष्ट्रीय शैक्षणिक शहराच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल, ‘ही’ विद्यापीठे भारतात येणार

हिंदलॅब्स ही देशव्यापी निदान (Diagnostic) साखळी असून खारघर केंद्राला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानके पूर्ण करून अचूक आणि विश्वासार्ह चाचणी निकाल देण्याच्या क्षमतेसाठी ही मान्यता मिळाली आहे. एचएलएल अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही उपलब्धी नागरिकांना परवडणाऱ्या, गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा देण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे.

सीएपी मान्यता ही निदान प्रयोगशाळांसाठी जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त गुणवत्ता बेंचमार्क आहे. या मान्यतेमुळे प्रयोगशाळेत रुग्णसेवा, चाचणी अचूकता आणि सुरक्षा मानकांचे सर्वोच्च पालन केले जात असल्याचे सिद्ध होते. हिंदलॅब्स खारघर प्रयोगशाळेने कठोर ऑडिट प्रक्रिया पार करत उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे.

एचएलएल ही गेल्या नऊ वर्षांपासून महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठ्या राज्यव्यापी मोफत प्रयोगशाळा सेवा कार्यक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करत आहे. “महालॅब्स सेवा” म्हणून ओळखला जाणारा हा उपक्रम राज्य सरकारसाठी राबविला जात आहे. एचएलएलने 134 हिंदलॅब्स स्थापन केल्या आहेत ज्या दररोज 50,000 हून अधिक रुग्णांचे नमुने हाताळतात. या प्रयोगशाळा 3,600 हून अधिक सार्वजनिक आरोग्य सुविधांमधील रुग्णांना अचूक आणि विश्वासार्ह चाचणी अहवाल देतात, ज्यामुळे वेळेवर निदान, प्रभावी उपचार आणि सुधारित आरोग्य परिणाम सुनिश्चित होतात. प्रत्येक प्रयोगशाळा आधुनिक चाचणी तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, पूर्णपणे डिजिटल प्लॅटफॉर्मवर कार्यरत आहे आणि गुणवत्ता नियंत्रण आणि हमी मानकांचे काटेकोरपणे पालन करते.

दिल्लीतील प्रदूषणाचा परिणाम! पाचवीपर्यंतचे वर्ग हायब्रिड पद्धतीने सुरू, बोर्डाची परिक्षा ऑनलाईन?

हिंदलॅब्सच्या ६ प्रयोगशाळांना आधीच NABL मान्यता मिळाली असून सर्व प्रयोगशाळा पूर्णपणे डिजिटल पद्धतीने कार्यरत आहेत. एचएलएलने २००८ मध्ये दिल्लीपासून सुरुवात करून आज २० राज्यांमध्ये २३० हून अधिक प्रयोगशाळांचे नेटवर्क उभारले आहे. या माध्यमातून आतापर्यंत ८ कोटीहून अधिक रुग्णांना सेवा देण्यात आली आहे.

Web Title: Hlls hindlabs kharghar laboratory is the first cap accredited public laboratory in the country

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 05:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.