Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाचन-लेखनाची आवड असणाऱ्यांसाठी योग्य पर्याय! जाणून घ्या पात्रता व प्रवेश प्रक्रिया

वाचन लेखनाची आवड असेल तर लिबरल आर्ट्स हा अत्यंत योग्य पर्याय आहे. लिबरल आर्ट्स क्षेत्रात करिअर करण्यासाठी काही पात्रता आणि प्रवेश प्रक्रियेला पात्र करावी लागणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 16, 2025 | 02:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • लिबरल आर्ट्सची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे विषय निवडीचे स्वातंत्र्य.
  • विविध शाखांचा समन्वय साधूनच शिक्षण दिले जात असे.
  • करिअरच्या दृष्टीने पाहता लिबरल आर्ट्सचे पर्यायही विस्तृत
आजच्या जागतिकीकरणाच्या आणि वेगाने बदलणाऱ्या युगात केवळ एकाच विषयात मर्यादित ज्ञान असून चालत नाही. नोकरीच्या बाजारात आता पाठांतरापेक्षा विचार करण्याची पद्धत, समस्या सोडविण्याची क्षमता, संवादकौशल्य आणि सतत बदलांना सामोरे जाण्याची अनुकूलता अधिक महत्त्वाची ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर लिबरल आर्ट्स शिक्षणपद्धतीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसत आहे. ‘काय शिकायचे?’ यापेक्षा ‘कसे विचार करायचे?’ यावर भर देणारी ही शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, सर्जनशीलता आणि बहुविध दृष्टिकोन विकसित करते. त्यामुळे भारतातील बदलत्या शिक्षणप्रवाहात लिबरल आर्ट्स हा एक महत्त्वाचा आणि आधुनिक पर्याय म्हणून पुढे येत आहे.

NDA 2026: एनडीएसाठी Maths का गरजेचं? बारावीत PCM शिवाय अर्ज करणं शक्य, तरीही गणिताशिवाय सैन्य अधिकारी होणे अशक्य का?

लिबरल आर्ट्सची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे विषय निवडीचे स्वातंत्र्य. पारंपरिक शिक्षणात एका शाखेतच अडकून राहावे लागते; मात्र लिबरल आर्ट्समध्ये तसे बंधन नसते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याने मानसशास्त्र हा मुख्य विषय (मेजर) निवडला असेल, तर त्यासोबत अर्थशास्त्र, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान, कला, भाषा किंवा वर्तनशास्त्र यांसारख्या विषयांचा अभ्यास करता येतो. यामुळे विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास सर्वांगीण होतो. ही संकल्पना काहीशी नवी वाटत असली, तरी भारतीय गुरुकुल शिक्षणपद्धतीत धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान, युद्धशास्त्र, प्रशासन आणि व्यापार अशा विविध शाखांचा समन्वय साधूनच शिक्षण दिले जात असे.

लिबरल आर्ट्स अभ्यासक्रम कोणासाठी योग्य आहे, हा प्रश्न अनेकांना पडतो. ज्यांना वाचन-लेखनाची आवड आहे, समाजातील घडामोडींवर विचारपूर्वक मत मांडण्याची सवय आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करण्याची तयारी आहे आणि मानवी समाज, इतिहास, राजकारण, साहित्य व संस्कृती यांचा अभ्यास करण्याची उत्सुकता आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी लिबरल आर्ट्स अतिशय उपयुक्त ठरतो. बारावी कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असतात. काही महाविद्यालये बारावीच्या गुणांवर किंवा सीयुईटी (CUET) परीक्षेद्वारे प्रवेश देतात, तर काही नामांकित विद्यापीठे स्वतंत्र प्रवेश परीक्षा व मुलाखत घेतात. या प्रक्रियेत भाषिक कौशल्य, तार्किक विचार, सामान्यज्ञान, लेखन आणि विश्लेषणात्मक क्षमता तपासली जाते.

लिबरल आर्ट्समध्ये पदवी, पदव्युत्तर आणि पीएच.डी.पर्यंत शिक्षण घेता येते. अभ्यासक्रमात मेजर, मायनर, इलेक्टिव्ह विषय, कौशल्याधारित शिक्षण, प्रकल्प, इंटर्नशिप आणि अनुभवाधारित अध्ययन यांचा समावेश असतो. कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांतील विषय निवडण्याची मोकळीक मिळते. यामुळे विद्यार्थ्याला स्वतःच्या आवडी आणि करिअरच्या उद्दिष्टांनुसार शिक्षणाची दिशा ठरवता येते.

मराठी शाळांच्या अस्तित्वासाठी गुरुवारी एल्गार! ‘ठोस कृतीशिवाय शाळा वाचणार नाहीत,’ अभ्यास केंद्राचा इशारा 

करिअरच्या दृष्टीने पाहता लिबरल आर्ट्सचे पर्यायही विस्तृत आहेत. पत्रकारिता, मीडिया रिपोर्टिंग, एडिटिंग, जनसंपर्क, जाहिरात, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, मानव संसाधन व्यवस्थापन, संशोधन, समाजसेवा, शिक्षण, नागरी सेवा, क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज, आंतरराष्ट्रीय संबंध आणि पर्यटन अशा विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत. डिजिटल साक्षरता, डेटा अॅनालिटिक्स आणि डिझाईन थिंकिंगसारखी आधुनिक कौशल्ये मिळाल्यामुळे देशांतर्गतच नव्हे तर जागतिक स्तरावरही लिबरल आर्ट्स पदवीधारकांसाठी करिअरचे नवे दरवाजे खुले होत आहेत.

Web Title: How to do career in liberal arts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 02:59 PM

Topics:  

  • liberation
  • Student Career Tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.