Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-पाकिस्तान तणाव वाढला; ICAI कडून CA परीक्षांचे पेपर पुढे ढकलले

पाक भारत युद्धामुळे देशात तणावाचे वातावरण आहे. या अनुषंगाने, ICAI ने CA च्या परीक्षा Postponed केल्या आहेत. या संबंधित अधिकृत माहिती ICAI च्या अधिकृत संकेतस्थळावर वाचता येईल.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 09, 2025 | 02:02 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मे 2025 मध्ये होणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट फायनल, इंटरमिजिएट आणि पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स परीक्षांचे उर्वरित पेपर आता पुढे ढकलण्यात आले आहेत. ही माहिती ICAI ने अधिकृत पत्रकाद्वारे दिली आहे.

टेरिटोरियल आर्मीमध्ये अधिकारी पदासाठी भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरू

13 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या महत्त्वपूर्ण घोषणेमध्ये बदल करत ICAI ने सांगितले की, “देशातील तणावपूर्ण आणि असुरक्षित परिस्थिती लक्षात घेता 9 मे 2025 ते 14 मे 2025 दरम्यान होणारे उर्वरित पेपर्स (CA Final, Intermediate, आणि International Taxation – Assessment Test INTT AT) पुढे ढकलण्यात येत आहेत.”

नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, असेही ICAI ने स्पष्ट केले आहे. परीक्षार्थ्यांना ICAI च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.icai.org) संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ही संपूर्ण परिस्थिती 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झाली. या हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. त्यानंतर भारताने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला चढवला. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही गोळीबाराची तीव्रता वाढवली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुला, उरी, पूंछ, मेंधार आणि राजौरी अशा सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्तानकडून तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. या भीषण गोळीबारात 16 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत.

राज्यातील पीएमश्री शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापकांची भरती; गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना

ही परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून ICAI ने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये यामुळे काहीशी चिंता निर्माण झाली असली, तरी ICAI ने दिलेल्या आश्वासनानुसार नवीन वेळापत्रक लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ICAI च्या या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमित लक्ष ठेवावे. उमेदवारांना अधिक माहिती या संकेतस्थळावरून कळवण्यात येणार आहे.

Web Title: Icai postpones ca exam papers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • CA Result

संबंधित बातम्या

CA बनायचे आहे… पण आर्थिक अडचणी आहेत? जाणून घ्या संपूर्ण आर्थिक गणित
1

CA बनायचे आहे… पण आर्थिक अडचणी आहेत? जाणून घ्या संपूर्ण आर्थिक गणित

ICAI CA Final मे 2025 चा निकाल लवकरच, कसे तपासाल?
2

ICAI CA Final मे 2025 चा निकाल लवकरच, कसे तपासाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.