रेल्वेने बेरोजगारांसाठी एक नवी संधी आणली आहे. नव्याने अनेक पदांवर लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तुम्ही जर बारावी किंवा पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं असेल आणि तुम्हाला रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे. भारतीय रेल्वच्या ईशान्य रेल्वे विभागामध्ये क्रीडा कोट्याअंतर्गत गट क पदांसाठी भरती करत आहेत. एकूण २१ पदांसाठी ही भरती होत आहे. पात्र उमेदवार भारतीय रेल्वेच्या ner.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. २५ एप्रिल २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यानंतरचे अर्जांचा विचार केला जाणार नाही.
अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांने कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून १२वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय वरिष्ठ, युवा किंवा कनिष्ठ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान प्राप्त केलेले असावे.
स्तर – २: ग्रेड पे रु १९०० आणि पे बँड रु ५२००-२०२००
स्तर – ३: ग्रेड पे रु.२,००० आणि पे बँड रु.५२०० -२०२००
स्तर – ४: ग्रेड पे रु २४०० आणि पे बँड रु. ५२०० -२०२००
स्तर – ५: ग्रेड पे रु. २८०० आणि पे बँड रु. ५२०० -२०२००
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे ते २५ वर्षे असावे.
क्रीडा तसेच शैक्षणिक पात्रता तसेच संबंधित खेळाच्या चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ५०० रुपये शुल्क भरावे लागेल. SC, ST, माजी सैनिक, बेंचमार्क अपंग व्यक्ती (PWBD), महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांसाठी शुल्क २५० रुपये असेल.