Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway Recruitment : पश्चिम रेल्वेकडून ५ हजार ३४९ जागांसाठी मेगा भरती; दहावी आणि ITIमधील गुणांच्या आधारे होणार निवड

रेल्वे भरती प्रक्रियेसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नसून, उमेदवारांची निवड दहावी आणि आयटीआयमधील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून केली जाणार आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 25, 2026 | 02:15 PM
Railway Recruitment Mega Recruitment for 5 thousand 349 posts from Western Railway

Railway Recruitment Mega Recruitment for 5 thousand 349 posts from Western Railway

Follow Us
Close
Follow Us:

Railway Recruitment : नांदेड : रेल्वेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची मोठी बातमी आहे. पश्चिम रेल्वेअंतर्गत तब्बल ५,३४९ जागांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून २३ मार्च २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नसून, उमेदवारांची निवड दहावी आणि आयटीआयमधील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून केली जाणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. फिटर,वेल्डर, इलेट्रिशियन, टर्नर, कारपेंटर, वायरमन, प्लंबर आदी विविध ट्रेडसाठी पदे उपलब्ध असून एकूण ५,३४९ जागा भरल्या जाणार आहेत. निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : ‘महाज्योती’चे प्रशिक्षणच झाले ठप्प; इंटरनेटची अस्थिरता, वारंवार खंडित होणारी वीजपुरवठा व्यवस्था

मुंबईसह विविध ठिकाणी सेवा
महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई विभागासह पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांमध्ये प्रशिक्षण व नियुक्तीची संधी उपलब्ध होणार आहे. मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर या विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित कार्यशाळा व युनिटमध्ये काम करण्याची संधी मिळेल.

संकेतस्थळावरील सूचनांचे पालन
अर्ज करताना दहावीचे मार्कशीट, आयटीआय प्रमाणपत्र, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), रहिवासी दाखला, पासपोर्ट साइज फोटो आणि स्वाक्षरी यांसारखी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करून अचूक माहिती भरावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

हे देखील वाचा : Samruddhi Mahamarg 1150 Crore Scam: समृद्धी महामार्गात १,१५० कोटी रुपयांचा घोटाळा! दानवेंचा भुमरेंवर गंभीर आरोप

ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस झाली सुरूवात
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ मार्च २०२६ आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीतच अर्ज सादर करणे आवश्यक आहे. एससी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे, तर इतर उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
भरती संदर्भातील संपूर्ण जाहिरात, पात्रता अटी, क्योमर्यादा आणि ऑनलाइन अर्जाची लिंक https://kopargaonlive.com/indian-rail-way\ recruitment / या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वेत स्थिर आणि सुरक्षित नोकरी मिळविण्यासाठी ही सुवर्णसंधी असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.

Web Title: Railway recruitment mega recruitment for 5 thousand 349 posts from western railway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Indian Railway
  • nanded news
  • Western Railway

संबंधित बातम्या

अंदाज समितीकडून मनपाची झाडाझडती; प्रशासकीय कारभारातील गंभीर त्रुटी उघडकीस
1

अंदाज समितीकडून मनपाची झाडाझडती; प्रशासकीय कारभारातील गंभीर त्रुटी उघडकीस

कंदकुर्तीतील हेडगेवार स्मृती स्थळाचे काम अंतिम टप्प्यात; लोकार्पण सोहळ्यास मोहन भागवत राहणार उपस्थित
2

कंदकुर्तीतील हेडगेवार स्मृती स्थळाचे काम अंतिम टप्प्यात; लोकार्पण सोहळ्यास मोहन भागवत राहणार उपस्थित

Nanded Politics : राजकारणात आली नवी रंगत! विधान परिषदेच्या रिंगणात ‘मोठ्या चेहऱ्यांची’ प्रतिष्ठा पणाला
3

Nanded Politics : राजकारणात आली नवी रंगत! विधान परिषदेच्या रिंगणात ‘मोठ्या चेहऱ्यांची’ प्रतिष्ठा पणाला

Bullet Train: खाली ट्रेन, वर बुलेट ट्रेन! रेल्वे ट्रॅकवर लाँच झाला १३६० टनाचा सर्वात जड गर्डर; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केल Video
4

Bullet Train: खाली ट्रेन, वर बुलेट ट्रेन! रेल्वे ट्रॅकवर लाँच झाला १३६० टनाचा सर्वात जड गर्डर; रेल्वे मंत्र्यांनी शेअर केल Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.