Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईपीएस सुमन नाला : जिद्द, सेवा आणि सामाजिक परिवर्तनाची प्रेरणादायी कहाणी

आयपीएस सुमन नाला यांनी गुजरातमधील बनासकांठा येथे १२ वर्षांपासून सामाजिक बहिष्कार झेलणाऱ्या २९ आदिवासी कुटुंबांची घरवापसी सुनिश्चित करत समाजातील ऐक्य आणि समतेचा आदर्श निर्माण केला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 24, 2025 | 06:30 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आईपीएस सुमन नाला यांनी केवळ एक यशस्वी अधिकारी म्हणून नव्हे, तर सामाजिक समरसतेचा दीप उजळवणारी नेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील आदिवासी भागात गेल्या १२ वर्षांपासून सामाजिक बहिष्कार झेलत असलेल्या २९ कुटुंबांची घरवापसी त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाली. त्यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे ही घटना केवळ कायद्याची अंमलबजावणी न राहता सामाजिक पुनर्बांधणीचे प्रतीक बनली.

ट्रेनी पदांसाठी करा अर्ज! BDL च्या ‘या’ स्पेशल भरतीविषयी जाणून घ्या

सुमन नाला मूळतः एक तंत्रज्ञान तज्ज्ञ आहेत. त्यांनी २०१२ साली बिट्स पिलानी येथून संगणक विज्ञानात बी.टेक पदवी घेतली आणि पुढे ओरॅकल या बहुराष्ट्रीय कंपनीत तीन वर्षे काम केले. मात्र, त्यांना प्रशासनात येऊन समाजासाठी कार्य करायचे होते. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडून यूपीएससीसाठी तयारी सुरू केली. पहिल्यांदा २०१६ मध्ये त्यांनी परीक्षा दिली, परंतु मुख्य परीक्षेत अपयश आले. २०१७ मध्ये त्यांनी इंटरव्ह्यूपर्यंत मजल मारली, पण अंतिम यादीत स्थान मिळाले नाही. २०१८ मध्येही अपयश आले. मात्र, चौथ्या प्रयत्नात २०१९ मध्ये त्यांनी ५०८वी रँक मिळवत यूपीएससी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आणि भारतीय पोलिस सेवेत निवड झाली.

सुरुवातीला त्यांचे कॅडर झारखंड होते. मात्र, गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी ओमप्रकाश जाट यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचा बदली गुजरातमध्ये झाली. तेव्हापासून त्या गुजरातमध्ये कार्यरत आहेत. बनासकांठा जिल्ह्यात सामाजिक बहिष्कार झेलत असलेल्या आदिवासी कुटुंबांना न्याय मिळवून देणे हे एक मोठे आव्हान होते. सुमन नाला यांनी या प्रकरणात केवळ प्रशासकीय हस्तक्षेप केला नाही, तर समाजाच्या विश्वासात जाऊन संवाद साधला. त्यांनी दोन्ही गटांमध्ये सलोखा निर्माण करत १२ वर्षांची तुटलेली नाती पुन्हा जोडली.

MIT-WPU च्या NSRTC 2025 ची यशस्वी सांगता! विज्ञान, AI व शाश्वततेसाठी नवदृष्टीचा जागर

त्यांची ही कृती केवळ एक अधिकाऱ्याची कर्तव्यपूर्ती नसून, सामाजिक समतेसाठी झटणाऱ्या नेतृत्वाची साक्ष आहे. आयपीएस सुमन नाला आज देशभरातील युवकांसाठी एक आदर्श बनल्या आहेत, ज्यांनी जिद्द, चिकाटी आणि संवेदनशीलतेच्या जोरावर समाजाला एकत्र आणले.

Web Title: Ips suman nala an inspiring story of determination service and social change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • IPS

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.