फोटो सौजन्य - Social Media
देशातील अनेक तरुण मंडळी इसरोमध्ये काम करण्यास इच्छुक असतात. देशातील अनेक तरुणांचे इसरोसाठी काम करण्याची इच्छा असते. महत्वाची बाब अशी आहे कि इंडियन स्पेस रिसर्च सेंटरने या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. अनेक उमेदवारांनी यामध्ये आपले अर्ज नोंदवण्यास सुरुवात देखील केली आहे. १९ सप्टेंबरपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून उमेदवारांना २३ सप्टेंबर पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. जर तुम्ही देखील इसरो मध्ये काम करण्यास इच्छुक आहात तर जाहीर वेळोमर्यादेच्या आत अर्ज करावे, अन्यथा मुदतीनंतर केले गेलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी hsfc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
हे देखील वाचा : DU मध्ये अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; त्वरित करा अर्ज, ‘या’ दस्तऐवजांची भासेल गरज
ISRO द्वारे राबवण्यात येणारी ही अर्ज प्रक्रिया विविध पदांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, वैज्ञानिक/अभियंता, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, ड्राफ्ट्समन, आणि राजभाषा सहाय्यक या पदांचा समावेश आहे. एकूण ९९ जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजली जात आहे. या पदांमध्ये अनुभवी तसेच संबंधित शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भात अधिसूचनाही जाहीर करण्यात आली होती. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर या अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्काचे भुगतान करावे लागणार आहे. जनरल तसेच ओबीसी आणि EWS क्ष्रेणीतील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. तसेच SC/ ST/ PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील ७५० रुपयेच अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्क भरता येणार आहे.
हे देखील वाचा : IIBF मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती; अर्ज करण्यासाठी उमेदवारांची गर्दी
निवड प्रक्रियेमध्ये ४ टप्प्यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यांत उमेदवाराची लेखी परीक्षा घेतली जाईल. यानंतर उमेदवाराचे मुलाखतीद्वारे कौशल्य पाहिले जाईल. नंतर दस्तऐवजांच्या तपासणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारावर उमेदवाराची नियुक्ती केली जाईल. लेखी परीक्षेची तारीख अद्याप कळवण्यात आली नाही आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिकुत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा आणि भरतीविषयक सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवावी.