फोटो सौजन्य - Social Media
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP)ने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनमध्ये या भरतीविषयी सांगण्यात आले आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध विभांगांमध्ये उमेदवारांची भरती केली जाणार आहे. सब इन्स्पेकटर, हेड कॉन्स्टेबल (Telecom), कॉन्स्टेबल (Telecom)च्यापदासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरतीसाठी आयोजित अर्ज प्रक्रियेला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. या भरतीसाठी स्त्री तसेच पुरुष दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. recruitment.itbpolice.nic.in. या अधिकृत संकेस्थळावर जाऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
५२६ रिक्त पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजली गेली आहे. संपूर्ण भारतभरात या भरतीच्या प्रक्रियेला राबवण्यात येत आहे. सरकारी नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरती संदर्भात अधिकन माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांन जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. १५ नोव्हेंबरपासून उमेदवारण्य भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात आला असून, १४ डिसेम्बरपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यास इच्छुक उमेदवारांची नियुक्ती परीक्षेच्या आधारावर केली जाणार आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजित केली जाणार आहे.
मुळात, अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. अर्ज शुल्काची रक्कम पदानुसार आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. सब इन्स्पेक्टरच्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. EWS तसेच OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील या भारटोसाठी २०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना कोंटी७आहे अर्ज शुलकाची भरपाई करण्याची आवश्यकता नाही. तसेच HC किंवा कॉन्स्टेबलच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना १०० रुपये भरायचे आहेत. तर येथे ही SC तसेच ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. अर्ज शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
जास्त पगार देणारे शहरे; जाणून घ्या
मुळात, या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती उमेदवाराच्या वयासबंधित आहेत तर काही अटी शर्ती शिक्षणा संबंधित आहेत. SI च्या पदासाठी अर्ज करते उमेदवार B.Sc./ B.Tech/ BCA विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे. तर हेड कॉस्टेबलच्या पदासाठी अर्जकर्ते उमेदवार PCM/ ITI/ Diploma in Engg या विषयात अंडर ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. तर कॉन्स्टेबल पदासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिक माहितीसाठी जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.