देशामध्ये कोणत्या शहरांमध्ये जास्त पगार मिळतो? याचा शोध तर प्रत्येलकाला असतो. शिक्षण झाले तर बहुतेक जण कामाच्या शोधामध्ये असतात. या दरम्यान, तरुण अनेक प्रश्नांना सामोरे जात असतो. ज्यातील सर्वात महत्वाचा आणि सामान्य प्रश्न म्हणजे देशामधील असे शहर कोणते? जिथे सर्वाधिक पगार दिले जाते. शिकून सवरून कामाच्या शोधात शहराची वाट धरणाऱ्या उमेदवारांसाठी ही फार महत्वाची माहिती आहे.
देशातील 'या' शहरांमध्ये मिळतो सर्वाधिक पगार. (फोटो सौजन्य - Social Media)
'सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया' म्हणून ओळखले जाणारे बेंगळुरू हे शहर माहिती तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्ससाठी आघाडीवर आहे. उच्च कौशल्यांसाठी येथे सर्वोच्च वेतन मिळते.
आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईत बँकिंग, फाइनान्स आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक संधी आहेत, ज्यामुळे इथे कामगारांना चांगला पगार मिळतो.
दिल्ली आणि त्याचे आसपासचे क्षेत्र एनसीआर हे आयटी आणि इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये उच्च वेतनाची ऑफर करतात. विशेषत: गुरुग्राम येथे वेतनाची वाढ होते आहे.
माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात मजबूत असलेले पुणे, उच्च शिक्षणामुळे आणि तंत्रज्ञान संधींमुळे वेतनात चांगल्या पातळीवर आहे.
चेन्नई हे शहर आयटी, ऑटोमोटिव्ह आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी ओळखले जाते आणि येथे वेतनात चांगली वाढ होत आहे.